या ५ बियाही असतात अतिशय पौेष्टीक!

 भाज्या, फळे पोषक असल्याने आपण त्यांचा आहारात समावेश करतो.

Updated: May 24, 2018, 12:19 PM IST
या ५ बियाही असतात अतिशय पौेष्टीक! title=

मुंबई : भाज्या, फळे पोषक असल्याने आपण त्यांचा आहारात समावेश करतो. पण फळांच्या बिया दुर्लक्षित राहतात. काही बिया अत्यंत पौष्टीक असून त्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. त्यामुळे त्यांचाही आहारात समावेश करणे फायेदशीर ठरेल. तर पहा कोणत्या आहेत त्या बिया आणि त्यांचे फायदे...

पपईच्या बिया:

कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांचा उत्तम स्त्रोत असलेल्या पपईच्या बियांमध्ये अँटी बॅक्टरील आणि अँटी इनफ्लामेटरी गुणधर्म देखील असतात. त्याचा चांगला परिणाम पचन संस्थेवर होतो.

अळशी:

अळशी हा ओमेगा ३ फॅट्सचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर फायबर, व्हिटॅमिन बी १ आणि कॉपर, मॅग्नेशियम, सेलेनियम यासारखे मिनरल्स देखील यात असतात.

सूर्यफुलाच्या बिया:

सूर्यफुलाच्या बियांमध्ये ओमेगा ६ फॅट्स आणि उत्तम प्रमाणात व्हिटॅमिन के आणि बी कॉम्प्लेक्स असतं. त्याचबरोबर कॅल्शियम, आयर्न, मॅगनीज, झिंक आणि amino acid tryptophan असतं.

भोपळ्याच्या बिया:

यात MUFA आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड असते. यात देखील मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम, मॅगनीज, झिंक, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर आणि सेलेनियम यांसारखे मिनरल्स असतात.

कलिंगडाच्या बिया:

यात ओमेगा ६ फॅटी अॅसिड असते. तसेच कलिंगडाच्या बिया हा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, पोटॅशियम आणि कॉपर यांसारख्या मिनरल्सचा चांगला स्त्रोत आहे.