Cancer : सॅनिटरी पॅड्सच्या वापराने कॅन्सर होतो? जाणून घ्या डॉक्टर नेमकं काय सांगतात ?

Cancer : प्रायव्हेट पार्ट (private part cleaning)  स्वच्छ करण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स चा वापर टाळा, त्याऐवजी कोमट पाणी वापरा, पाण्याने स्वच्छ केल्यावर  सुक्या कापडाने कोरडं करायला विसरू नका.

Updated: Feb 15, 2023, 11:57 AM IST
Cancer :  सॅनिटरी पॅड्सच्या वापराने कॅन्सर होतो? जाणून घ्या डॉक्टर नेमकं काय सांगतात ?  title=

Cancer causing chemicals in sanitary pads: सॅनिटरी नॅपकिन वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो , असे अनेक समज गैरसमज आजही समाजात आहेत. एका सर्व्हेमध्ये भारतातील जवळपास 10 सॅनिटरी नॅपकिनच्या ब्रॅंड्सची चाचणी करण्यात आली  त्यांच्या परीक्षणानंतर असं दिसून आलं की, पॅड्स योग्यरीत्या बसण्यासाठी दुमडण्यातही काही ठराविक केमिकल्सचा वापर करण्यात येत आहे शिवाय सुगंधित राहावं यासाठीसुद्धा काही केमिकल्स वापरले  जात आहेत, आणि कॅन्सर होण्यासाठी ही कारण पुरेशी आहेत. (cancer in indian women is cause of sanitary napkin)

पिरियड्स दरम्यान पॅड्सचा वापर केला जातो, अश्यावेळी योनीमार्गाचा प्रवेशद्वार खुले असते आणि अश्यात हे केमिकल्सचा संपर्कात येत (chemicals from sanitary napkins causes cervical cancer) आणि कॅन्सर होण्याची शक्यता दुपटीने वाढते.  (Can Sanitary Napkins Cause Cancer)

या बाबतीत काही तद्न्य डॉक्टर  सांगतात की, जे काही अंशी जरी खरं असाल तरी या बाबतीत काही संशाधनातही चुका आहेत शिवाय हा दावा खरा आहे आणि ते हि 100 टक्के . हे कुठल्याही जर्नलमध्ये लिहिण्यात आलं नाहीये. रिसर्चनुसार भारतात जवळपास 64 टक्के महिला पॅड्सचा वापर मासिक पाळीदरम्यान करतात. 

मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं असत. मात्र बऱ्याच महिलांना आणि मुख्यतः गावाकडील खेड्यापाड्तीयातील महिलांना अजून याबाबतीत तशी जागरूकता नाहीये.  (hygiene during periods is must )

मासिक पाळीदरम्यान स्वच्छता न पाळल्यामुळे महिलांमध्ये अनेक आजार होऊ शकतात, आणि या अनेक आजारांपैकी 'कॅन्सर' हा एक आजार आहे , मासिक पाळीदरम्यान योनी मार्गाची पीएच पातळी बदलते, त्यामुळे त्या भागात बॅक्टरीया संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केवळ पॅड नाही तर मासिक पाळीदरम्यान काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण ओव्हरीयन कॅन्सर (overian cancer) सारखा महाभयंकर आजार होण्यापासून थांबवू शकतो. 

पिरिएड्सदरम्यान या गोष्टींची काळजी घ्या

  • दर 3-5 तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदला 
  • पिरियड्स चालू असताना पर्सनल हायजिनकडे विशेष लक्ष द्या. 
  • बराच वेळ एकच पॅड वापरल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक वाढतो . 
  • सॅनिटरी पॅड्ससोबत इनरवेअर बदलायला विसरू नका . 
  • मासिक पाली दरम्यान आणि इतरवेळीसुद्धा कॉटनचे इनरवेअर घालत जा. 
  • प्रायव्हेट पार्टजवळची जागा नेहमी स्वच्छ ठेवत जा. 
  • प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स चा वापर टाळा, त्याऐवजी कोमट पाणी वापरा, पाण्याने स्वच्छ केल्यावर  सुक्या कापडाने कोरड करायला विसरू नका. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x