Health Tips : दिवसभरात किती मीठ खाणं योग्य? किती खावू नये? जाणून घ्या योग्य प्रमाण...

Salt Intake Tips : रोजच्या अन्नात मिठाचा वापर जरी महत्वाचा असला तरी अति प्रमाणात मिठाचा वापर केल्याने शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दिवसभरात किती मीठाचे प्रमाण असावे ते जाणून घ्या...

श्वेता चव्हाण | Updated: Jun 19, 2023, 04:31 PM IST
Health Tips : दिवसभरात किती मीठ खाणं योग्य? किती खावू नये? जाणून घ्या योग्य प्रमाण...  title=
Salt Intake Tips

Health Tips News In Marathi : अन्नामध्ये मीठ (Salt) खूप महत्वाचे असून मिठाशिवाय अन्न शिजवता येत नाही. मीठाचे जेवणातील योगदान गरजेचे तर आहेच पण त्याचबरोबर आपल्या स्वास्थाचीदेखी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अतिप्रमाणात मीठाचे सेवन केल्याने अनेक आजार होतात. त्याचबरोबर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नेहमी कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. जेवणाच जास्त मीठ घेतल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे दिवसभरात एका माणसाने किती प्रमाणात मीठ खावे? आरोग्यासाठी किती फायदेशीर असेल हे तुम्हीच जाणून घ्या...

मिठाचा वापर अनेक पदार्थात केला जातो. पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पण शरीरासाठी मीठ योग्य पद्धतीने खाल्याने शरीरासाठी ते फायदेशीर ठरु शकते. उन्हाळ्यात जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनचा समुद्र वाढू शकतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या मते मीठ मर्यादित प्रमाणात खावे.  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ''जगातील बहुतांश लोक दररोज 9 ते 12  ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खातात. जे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. मिठाचा वापर कमी केला तर जगात दरवर्षी अडीच लाख मृत्यू टाळता येतील.  

जास्त मीठ खाल्ल्याने कोणते नुकसान? 

कोणत्याही वयात जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. शिवाय, आपल्या जेवणात जास्त मीठ असण्यातून इतरही काही धोके संभवतात. तसेच मीठ जास्त खाल्लं तर हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर आणि मेंदूतील रक्तप्रवाह बाधा पोचणे, त्यातून डोक्यातील एखादी रक्तवाहिनी फुटणे किंवा रक्ताच्या गाठी निर्माण होणे आदी नकारत्मक परिणाम होऊ शकतात. 

सर्वांनी 5 ग्रॅमपेक्षा कमी म्हणजेच दररोज 1 चमचे मीठ खावे. 15 वर्षांखालील मुलांनी कमी मीठ खावे. जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. मिठाच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा प्रकारे लोकांनी मीठावर नियंत्रण ठेवावे. जंक फूड आणि स्नॅक्समध्ये मीठ असते, त्यामुळे जंक फूड टाळणे उत्तम ठरेल. 

कोणत्या प्रकारच्या मिठात सर्वांत कमी सोडियम?

बाजारात अनेक प्रकारचं मीठ उपलब्ध आहे. अधिकाधिक जेवण रुचकर होण्यासाठी हे मीठ वापरलं जातं. या प्रकाराला सर्वांत कमी प्रमाणात सोडियम असणारे मीठ सर्वाधिक आरोग्यदायी असते. जगाच्या विविध भागांमध्ये मीठ तयार करण्याचे विविध मार्ग वापरले जातात. त्यात वापरणारे पदार्थ, रंग व चवयांनुसार मिठाचे अनेक प्रकार केले जातात. शुद्ध मीठ हे नियमितपणे वापरलं जातं. 97 ते 99 टक्के सोडियम क्लोराइड असते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)