.. म्हणून रात्रीच्या वेळेस सलाड सूप टाळा - ऋजुता दिवेकरचा खास सल्ला

आजकाल वजन घटवण्यासाठी जिममध्ये घाम गाळला जातो किंवा  जीवघेणा डाएट प्लॅन दिला जातो. पण अनेकदा हे दोन्ही मार्ग वजन घटवण्याऐवजी आरोग्याला अधिक त्रासदायक ठरतात. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 27, 2017, 10:29 AM IST
.. म्हणून रात्रीच्या वेळेस सलाड सूप टाळा - ऋजुता दिवेकरचा खास सल्ला  title=

मुंबई : आजकाल वजन घटवण्यासाठी जिममध्ये घाम गाळला जातो किंवा  जीवघेणा डाएट प्लॅन दिला जातो. पण अनेकदा हे दोन्ही मार्ग वजन घटवण्याऐवजी आरोग्याला अधिक त्रासदायक ठरतात. 

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने वजन घटवण्यासाठी सलाड किंवा सूप डाएट बनवणे चूकीचे असल्याचे सांगितले आहे. अनेकजण रात्रीच्या जेवणात केवळ सूप आणि सलाडचा समावेश करतात. पण अशाप्रकारचा डाएट करण्याऐवजी आहारात भाताचा समावेश करण्याचा सल्ला ऋजुता दिवेकरने दिला आहे.  

वेट लॉस फंडा 

ऋजुताच्या सल्ल्यानुसार आपण ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतो तेथील आहाराची आरोग्याला आवश्यकता असते. वजन घटवण्यासाठीदेखील पाश्चात्य डाएटचा वापर करण्याऐवजी घरगुती जेवणाचा समावेश करा. 

 

 

भात फायदेशीर  

वजन घटवण्यासाठी भात फायदेशीर आहे. अनेकजणांना वाटते भातामुळे वजन वाढतं पण हा चूकीचा समज आहे. ऋजुताच्या सल्ल्यानुसार भात  हा खिचडी, डाळ भात, दही भात, कढी भात, पेज अशा कोणत्याही स्वरूपात रात्रीच्या वेळेस खाणं आवश्यक आणि आरोग्यकारक आहे.