गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये हात-पाय-तोंड रोग अर्थात हॅन्ड-फूट-माउथ डिसीज होण्याचे प्रकार आढळून आले आहे. या संसर्गजन्य आजार असून लहान मुलांच्या हात, पाय आणि तोंडात पुरळ येतात, ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
या आजाराची सुरुवात तापापासून होते. मुलांना सुरुवातील ताप येतो आणि नंतर हात, पाय आणि तोंडात पुरळ येतात. पुरळ आल्यामुळे मुलांना अस्वस्थ वाटतं. तोंडात पुरळ आल्यामुळे मुलांना जेवण घेणे देखील कठीण होते.
हा आजार संसर्गजन्य असल्याने आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवून नये, असे आवाहन डॉ. हिना पंडीतपुत्र यांच्याकडून करण्यात येत आहे. मुलाला ताप, अंगावर पुरळ आणि तोंडात फोड आल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. उपचाराने हा आजार पाच दिवसांत बरा होतो, असे बालरोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हात-पाय-तोंड रोग या आजारावर विशिष्ट असे उपचार नाहीत. त्यामुळे यावर सामान्य ताप आल्यावर आणि पुरळ आल्यावर जी औषधे बाजारात उपलब्ध आहेत, तेच डॉक्टर सांगतात. या संसर्गापासून लक्षणे दिसण्यापर्यंतचा कालावधी 3 ते 6 दिवसांचा असतो.
हा आजार वेगाने एका मुलाकडून दुसऱ्या मुलांमध्ये पसरत असतो. त्यामुळे पालकांनी मुलांना घराबाहेर पाठवणे टाळा. शाळा, क्लास किंवा खेळण्याच्या ठिकाणी संसर्गजन्य मुलांना पाठवणं कटाक्षाने टाळा. मुलांना विलगीकरणात घरी बसवावे. या आजाराचे रुग्ण काही दिवसापासून दिसून येत आहेत. यावर वेळेवर उपचार घेतले पाहिजेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)