Belly fat कमी करायचंय तर वेळेवर जेवा, जाणून घ्या तिन्ही वेळेच्या खाण्याची योग्य वेळ!

तुमच्या जेवणाची वेळ ठरवते की, तुमचं तुम्ही फीट राहणार की बेली फॅटचे शिकार होणार.

Updated: Sep 17, 2022, 06:56 AM IST
Belly fat कमी करायचंय तर वेळेवर जेवा, जाणून घ्या तिन्ही वेळेच्या खाण्याची योग्य वेळ! title=

मुंबई : चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजणं वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहे. जीम जॉईन करण्यापासून ते डाएटिंगपर्यंत आणि वाढलेलं पोट कमी करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु असतात. तरीही, वजन कमी करण्यात यश मिळत नाही. आज आम्ही या समस्येचं कारण आणि त्यापासून सुटका होण्याचा पर्याय सांगणार आहोत. हे उपाय तुमच्या जेवणाच्या वेळेशी संबंधित आहेत. तुमच्या जेवणाची वेळ ठरवते की, तुमचं तुम्ही फीट राहणार की बेली फॅटचे शिकार होणार.

सकाळी नाश्ता करा

सर्व लोकांची सकाळच्या नाश्त्याची वेळ वेगळी असते. लोकं सकाळी कितीही वेळात उठले तरी फ्रेश झाल्यावर थोड्या वेळाने नाश्ता करतात. ही पद्धत योग्य नाही. खरं तर, सकाळी 7 वाजता नाश्त्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. तुम्ही सहसा सकाळी 7.00 ते 7.30 दरम्यान नाश्ता केला पाहिजे. व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे हे करणे शक्य नसेल तर सकाळी 8.30 पर्यंत नाश्ता नक्की करा. यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि हार्मोन्स योग्य प्रकारे काम करतात.

दुपारच्या जेवणाची वेळ 

आता दुपारचं जेवण. अनेकांना दुपारच्या जेवणासाठी योग्य वेळ खायला आवडते. मात्र असे बरेच लोक आहेत जे पोट कमी करण्यासाठी, दुपारचे जेवण बंद करतात आणि सलाड खातात. या दोन्ही पद्धती वजन कमी करण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळे पोटाच्या फॅटवर परिणाम होत नाही, पण तुमच्या शरीराची अंतर्गत पचनसंस्था नक्कीच बिघडते. त्यामुळे दुपारचं जेवण 12.30-1.00 पर्यंत करा.

रात्री लवकर खा

जे लोक लठ्ठपणाशी झुंजत आहेत, त्यांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळेकडेही विशेष लक्ष दिलं पाहिजं. जेवण उशिरा घेतल्यास शरीराला ते पचता येत नाही आणि रात्री गॅस आणि अपचनाचा त्रास होतो. यामुळे तुमच्या फॅटही सतत वाढत असतं. रात्रीच्या जेवणासाठी, संध्याकाळी 6.00-7.00 ची वेळ योग्य मानली जाते. रात्रीचं जेवण कमी जेवावं आणि ते जास्त तळलेले किंवा स्निग्ध नसावेत. जर तुम्ही खाण्याच्या या वेळेचं काटेकोरपणे पालन केले तर नक्कीच तुम्ही तुमचं वाढतं वजन सहज नियंत्रित करू शकता.