रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार

Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 10, 2024, 04:51 PM IST
रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार  title=

Side effects of using phone at night : आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. मोबाईल फोन वापरण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. अनेकांना मोबाईलचे इतके व्यसन लागले आहे की त्यांना मोबाईलशिवाय दुसरे काही दिसत नाही किंवा सूचत देखील नाही. काही लोक कॉलवर लोकांशी बोलण्यासाठीच मोबाईल फोन वापरतात असे नाही तर सोशल मीडियावर जेवण ऑर्डर करणे, किराणा सामान ऑर्डर करणे आणि महत्त्वाचे संदेश यांसारख्या गोष्टींसाठी देखील वापरतात. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच मोबाईल फोन ही आजच्या काळाची गरज बनली आहे. मात्र याच मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. मुख्य गोष्ट अशी आहे की, रात्रीच्या वेळी जास्त वापर केल्याने गंभीर समस्या उद्भवू शकतात. रात्रीच्या वेळी मोबाईल फोन वापरण्याची सवय अनेकांना लागली आहे. केवळ हेच आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा सल्ला आरोग्य तज्ञ्जांकडून देण्यात येतो. 

डोळ्यांना नुकसान

मोबाईल फोनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी खूप धोकादायक असतो. स्मार्ट फोन त्यांच्या लहान तरंगलांबीमुळे अधिक प्रभावित होतात. यामुळे तुमच्या रेटिनाला नुकसान होऊ शकते. अहवालानुसार, निळ्या प्रकाशामुळे केवळ रेटिनलचे नुकसान होत नाही तर तुमच्या दृष्टीवरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तुमचे डोळे खराब होऊ शकतात.

झोपेची वेळ बदलणे

प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. मध्यरात्रीपर्यंत मोबाईल पाहिल्याने झोपेची वेळ गेली असती. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नाही आणि दिवसा उठत नाही. काही वेळा मोबाईलच्या अतिवापरामुळे निद्रानाश होतो.

झोपेची कमतरता

फोनची रेंज मेलाटोनिनचे उत्पादनावर परिणाम होतो. मेलाटोनिन हा एक संप्रेरक आहे जो झोप आणि झोपेचे चक्र नियंत्रित करण्यास मदत करतो. बरेच लोक दररोज रात्री मोबाईल फोन वापरतात, ज्यामुळे झोप कमी होते. तसेच, तुमचा फोन तपासणे हे एक व्यसन बनते आणि त्यामुळे तुम्ही मध्यरात्रीपर्यंत जागे राहता.

तणाव वाढतो

तणाव कमी करण्यासाठी अनेकजण मोबाईल फोनला महत्त्व देतात. परंतु, इंटरनेटवर काहीतरी वाचणे, फोन बराच वेळ वापरणे, झोप न लागणे इत्यादी कारणांमुळे तुम्हाला तुमच्या फोनवर ताण येऊ शकतो. यावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर आजार होऊ शकतात.

स्मरणशक्ती कमी होणे

मोबाईलच्या अतिवापराचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. रात्री फोन वापरल्याने ब्रेनसोबत कनेक्शन बिल्ड करणे कठिण होते. तुम्हाला नीट विचार न करता येण्याचे हे एक कारण असू शकते. 

नैराश्याचा धोका वाढतो

रात्री जास्त वेळ मोबाईल फोन वापरल्याने तुमच्या झोपेवरच परिणाम होत नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मोबाईल फोनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचा तुमच्या संप्रेरकांवर आणि झोपेच्या पद्धतींवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अनेकांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा दिवसा अशक्त झाल्यासारख वाटतं. 

डोळ्यांजवळ डाग

तुम्ही अंधारात मोबाईल वापरता तेव्हा निळ्या रंगाची रेंज तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचते. यामुळे डोळे दुखणे, जळजळ होणे आणि डोळ्यांजवळ पुरळ येण्याची शक्यता असते.