महिलांमधील शारीरिक कमकुवतपणा, हृदयविकार यामागे नैराश्य

मध्यम वयातील नैराश्याचा संबंध अनेक गोष्टींशी येऊ शकतो. शारीरिक हालचाल कमी होण्यासही नैराश्य एक कारण असू शकतं.

Updated: Dec 20, 2019, 07:23 PM IST
महिलांमधील शारीरिक कमकुवतपणा, हृदयविकार यामागे नैराश्य title=

मुंबई : मध्यम वयातील नैराश्याचा संबंध अनेक गोष्टींशी येऊ शकतो. शारीरिक हालचाल कमी होण्यासही नैराश्य एक कारण असू शकतं. वेगवेगळ्या वयात नैराश्य आणि शारीरिक हालचाली यांचा काय संबंध असतो, यावर अभ्यास केला गेला आहे. यात नैराश्य आणि शारीरिक हालचाली यांचा परस्पराशी संबंध असल्याचं समोर आलं आहे.

मध्यम वयात नैराश्य येण्याची खूप कारण आहेत. याआधी देखील हे समोर आलं होतं की, महिलांमधील शारिरीक हालचालीच्या कमतरतेमुळे नैराश्य येतं. नवीन अभ्यासात हे देखील समोर आलं आहे की, वेगवेगळ्या वयोगटानुसार वयात नैराश्य आणि शारिरीक हालचालींचा संबंध आहे. बहुतांश मध्यम वयातील महिलांमध्ये नैराश्य पाहण्यात आले आहे. 

 या अभ्यासात ४५ ते ६९ वर्षाच्या ११०० पेक्षा जास्त महिलांना समावेश केला गेला. त्यात १५ टक्के महिलांनी सांगितले की त्यांनी नैराश्याचा सामना केला. त्यातल्या बहुतांश महिला मध्यम वयाच्या होत्या. हा अभ्यास 'जर्नल ऑफ नॉर्थ अमेरीकन मॅनोपॉज सोसायटी' मध्ये नमूद करण्यात आला आहे.
 
नैराश्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढत जातो. जीवनशैलीवर देखील याचा मोठा परिणाम होतो. यासाठी शास्त्रज्ञांनी नैराश्याच्या कारणांचा शोध घेणे सुरू केलं. ज्यामुळे लोकांमध्ये नैराश्य जास्तच जास्त कमी करता येईल.

नैराश्यामुळे हृदयरोग होण्याची भिती वाढते आणि जीवनशैलीवर ही परिणाम होतो. त्यामुळे संशोधकांनी नैराश्याची कारणं शोधून केले ज्यांच्या त्यावर उपचार कसे करता येतील हे शोधलं. 

अभ्यासात शारिरीक हालचाल आणि नैराश्याचा संबंध दिसला. यात समजलेकी शरिराच्या वरच्या भागात जर कमकुवतपणा असेल, जसे की हातात वस्तू पकडण्यास त्रास होणे, असे असेल तर नैराश्याचा धोका वाढलेला असू शकतो.