मुंबई : तुम्हाला वाटत असेल की तुम्ही साखर कमी खातात, तर तुम्हाला डायबीटीज म्हणजेच मधुमेह होणार नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. तुमची लाईफस्टाइल, तुम्ही काय खाता आणि कसं खाता या गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्हाला डायबीटीज होण्याची शक्यता किती आहे. तुमच्या मधुमेहवर जर उपचार झाले असतील, तर तुम्हाला या गोष्टीवर जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे.
अमेरिकेच्या मेरिलॅन्ड येथील बाल्टीमोरमध्ये झालेल्या न्युट्रिशन २०१९ च्या मिटींगमध्ये, एक अभ्यास मांडण्यात आला, ज्यात कोण काय खातं आणि कसे खातात. यावर मधुमेह होईल की नाही, याचे निष्कर्ष ठेवण्यात आले.
या अभ्यासात अमेरिकेचे २ हजार ७१७ जण सामिल झाले, त्यात काही तरूण, तर काही मध्यमवयाच्या लोकांचा समावेश होता, त्यानंतर त्यांच्या खाण्यावर खूप दिवस लक्ष ठेवण्यात आले.
ज्या लोकांनी २० वर्ष फळ, भाज्या, धान्य, नट्स, ड्रायफ्रुट्स आणि व्हेजिटेबल ऑईलला त्यांच्या डायटमध्ये ठेवले त्यांना मधुमेह होण्याची शक्यता ६० टक्के कमी असते.
ज्यांनी या सगळ्या गोष्टींचा समावेश केला नाही त्यांच्या तुलनेत. स्टडीनुसार खूप वेळ जर प्लांट बेस्ड डायटचा समावेश केला, तर मधुमेह होण्याची शक्यता कमी केले जाऊ शकते.
एवढंच नाही तर जे लोक डायटमध्ये सप्लिमेंटसच्या द्वारे विटामिन बी२ आणि विटामिन बी६ अधिक प्रमाणात घेतात. त्यांना पण मधुमेह होण्याची शक्यता आहे.
ज्या २ लाख लोकांना समविष्ट केले त्यातून समजले की, फळांद्वारे विटामिन बी१२ चे अधिक प्रमाणात सेवन केले जाते, ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ अॅनिमल बेस्ड प्रॉडक्टचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
एका अभ्यासानुसार तुम्ही कशा पद्धतीत जेवतात, त्याचा देखील रक्तातील साखरेच्या पातळीची संबंध आहे. आधी भात आणि भाजी किंवा मांस खाल्याने ब्लड शुगरची लेवल वाढते, जर आधी मांस, भाजी खाऊन नंतर मांस खाल्यास ब्लड शूगरला थांबवू शकतो.