दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे

मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात. 

Updated: Nov 9, 2017, 10:54 PM IST
दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे title=

मुंबई : मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात. 

मधामध्ये अँटीबॅक्टेरियस, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल हे गुण असतात. तसेच दुधामध्ये व्हिटामिन ए, बी,सी,डी, कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड ही पोषकतत्वे असतात. 

जाणून घ्या दररोज दोन चमचे मध आणि एक ग्लास दुधाचे फायदे

१. मध आणि दूध एकत्र प्यायल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते. तसेच त्वचा चमकदार होते. दूध आणि मध एकत्र मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार होते. 

२. गरम दुधात मध मिसळून प्यायल्याने तणाव दूर होण्यास मदत होते. 

३. चांगली झोप येण्यासाठी दुधात मध मिसळून प्या. झोपण्याआधी एक तास गरम दुधात मध मिसळून प्यायल्यास फायदा होतो.

४. दररोज एक ग्लास दुधात दोन चमचे मध टाकून प्यायल्यास पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते. 

५. दूध आणि मधाच्या मिश्रणाने आपले शरीर तर हेल्दी होतेच त्यासोबतच हाडेही मजबूत होतात. 

६. गरम दुधात मध मिसळून प्यायल्याने श्वसनासंबंधीच्या समस्या दूर होतात.