मुलींना Impress करायचं असेल, तर... प्रत्येक मुलाला माहित असाव्यात 'या' गोष्टी

मुलींना नक्की कोणत्या गोष्टी आवडतात? हा प्रश्न अनेक मुलांच्या मनात उपस्थीत राहातो. चला त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊ.

Updated: Aug 11, 2022, 10:15 PM IST
मुलींना Impress करायचं असेल, तर... प्रत्येक मुलाला माहित असाव्यात 'या' गोष्टी title=

मुंबई : मुला-मुलींची मैत्री अगदी सामान्य झाली आहे. अनेक लोक एकमेकांचे मित्र किंवा मैत्रीण बनतात, परंतु असं असलं तरी बऱ्याचदा मुलींना मुलांच्या काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत, ज्यामुळे त्या मैत्री तोडतात. तर कधी त्या मुलापासून लांब राहू लागतात. परंतु बऱ्याच मुलांना हे लक्षात येत नाही की, मुली आपल्यापासून लांब का जातात? किंवा लांब का राहू लागतात.

मग आता असं असेल तर मुलींना नक्की कोणत्या गोष्टी आवडतात? हा प्रश्न अनेक मुलांच्या मनात उपस्थीत राहातो. चला त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊ.

आत्मविश्वास ही पहिली गोष्ट आहे, ज्या बहुतेक मुली मुलांमध्ये शोधतात. जर एखादा मुलगा खूप आत्मविश्वासी असेल आणि त्याचा स्वतःवर विश्वास असेल, तर मुली त्याला लवकर पसंत करतात. ही गुणवत्ता मुलांना अधिक आकर्षक बनवते. आत्मविश्वास असलेल्या मुलाच्या आसपास राहिल्याने मुलींना असे वाटते की, त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.

बऱ्याचदा मुली या मुलांच्या ड्रेसिंग सेन्सवरून अंदाज लावतात की, समोरची व्यक्ती स्वतःकडे किती लक्ष देते.

मुली स्वभावाने अतिशय संवेदनशील आणि भावनिक असतात. मुलींना नेहमी मुलांनी त्यांचे ऐकावे असे वाटते. तुम्हाला मुलीचे बोलणं ऐकायला आवडो किंवा नाही, पण तरीही तुम्ही तिचे ऐकावे अशी मुलीची इच्छा असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही त्यांची आवडती व्यक्ती बनू शकता.

कंटाळवाणा जोडीदार कोणालाही आवडत नाही. त्यामुळे समोरील व्यक्ती खूपच मजेदार असणे आवश्यक आहे. जर एखादा मुलगा नेहमी हसत असेल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना हसवत असेल तर तो मुलींना खूप आकर्षित करतो.

करिअरमध्ये यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मुलाकडे मुली जास्त आकर्षित होतात. मुलीला तुमच्या पगाराची आणि स्थितीची अजिबात चिंता नसली, तरी तुमच्या करिअरवरून फक्त तुमची गंभीरता आणि परिपक्वता कळते.

मुले मुलीला तेव्हाच प्रभावित करू शकतात, जेव्हा ते समोरच्या व्यक्तीचा आदर करतात. त्यांनी मुलींसाठी काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडा, जेव्हा मुलीला थंडी वाजते तेव्हा तिला तुमचे जाकीट द्या. हे सगळं ऐकायला थोडं फिल्मी नक्कीच आहे, पण मुलींना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)