Liver Diseases: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो. यामधील एक अवयव म्हणजे यकृत. यकृत म्हणजेच लिव्हर आपल्या शरीरात असलेली घाण आणि टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. याशिवाय जेवण पचवण्यासाठी बायटल प्रोटीन आणि रेड ब्लड सेल्सचा निर्माण करण्यासाठी याची मदत होते. यकृत निरोगी ठेवणं देखील खूप महत्वाचं आहे. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान चुकीची लाईफस्टाईल आणि अयोग्य आहार यामुळे यकृताचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. यावेळी यकृत खराब होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसून येतात. जर तुम्हाला वारंवार उलट्या आणि मळमळ होण्याची समस्या येत असेल तर ही यकृत खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अनेकदा लोक गॅसची समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, पण वारंवार होत असल्यास यकृत खराब होण्याची समस्या असते.
वारंवार थकवा येणे हे देखील यकृत खराब होण्याची लक्षण असू शकतं. बरोबर खाऊनही थकल्यासारखे वाटत असल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
त्वचेवर खाज येणं हे यकृताच्या आजाराचं लक्षण असू शकते. यकृतामध्ये पित्त वाढल्यामुळे त्वचेवर जास्त प्रमाणात खाज येण्याची शक्यता असते. यकृत खराब झाल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात. यकृत खराब झाल्यावर पाय आणि घोट्याला सूज येऊ लागते.
निरोगी नखांवर गडद रेषा दिसत नाहीत, तर यकृत खराब झाल्यावर त्यावर लाल, तपकिरी किंवा पिवळ्या अशा रेषा दिसू लागतात.
जेव्हा यकृताची समस्या असते तेव्हा नखांचे रंग बदलण्याची शक्यता असते. नखांचा रंग बेरंग आणि पिवळा दिसू लागतो. यावेळी नखेवर दिसणारा पांढरा भाग हळूहळू नाहीसा होऊ लागतो.
जर नखं लवकर खराब होतात आणि तुटायला लागतात, तर ते यकृत खराब झाल्याचं लक्षण आहे. त्वचा पिवळी पडणं आणि डोळे पांढरे होणं हे यकृत खराब होण्याची लक्षणं आहेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)