Liver Disease: तुमच्या शरीरावर दिसतायत ही लक्षणं? सावध व्हा, यकृताची समस्या असू शकते!

Liver Disease Symptoms: ज्याप्रमाणे कावीळ झाली की, नखं आणि डोळ्यांप्रमाणे पिवळसर रंग दिसतो. त्याचप्रमाणे लिव्हरच्या विविध समस्यांची लक्षणं  (Liver disease symptoms) तुमच्या त्वचेवर दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत. 

Updated: Mar 30, 2023, 01:41 PM IST
Liver Disease: तुमच्या शरीरावर दिसतायत ही लक्षणं? सावध व्हा, यकृताची समस्या असू शकते! title=

Liver Disease ymptoms : असे अनेक आजार किंवा समस्या असतात, ज्यांची लक्षणं आपल्याला दिसून येत नाहीत. मात्र काही समस्या अशाही असतात, ज्यांची लक्षणं दिसून येतात, मात्र आपण ती ओळखू शकत नाही. असंच काहीसं लिव्हर (Liver disease) म्हणजेच यकृतासंबंधीच्या समस्यांचं आहे. ज्यावेळी यकृताच्या समस्या उद्भवतात, तेव्हा त्याची लक्षणं तुम्हाला त्वचेवर दिसून येतात. जर ही लक्षणं (Liver disease symptoms) तुमच्या लक्षात आली तर त्यावर वेळीच उपाय करणं योग्य ठरतं. 

ज्याप्रमाणे कावीळ झाली की, नखं आणि डोळ्यांप्रमाणे पिवळसर रंग दिसतो. त्याचप्रमाणे लिव्हरच्या विविध समस्यांची लक्षणं  (Liver disease symptoms) तुमच्या त्वचेवर दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत. 

त्वचेला खाज येणं

जर तुमचं यकृत खराब झालं असेल तर त्याचं पहिले लक्षण दिसून येतं म्हणजे रक्तात पित्त तयार होणं. यामध्ये पोटाचा मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि ते रक्तात मिसळू लागतं यानंतर त्वचेच्या खालच्या भागात हे जमा होतं. परिणामी तुमच्या त्वचेला खाज येण्याची समस्या उद्भवते.

स्पायडर एंजियोमास 

लिव्हरच्या समस्येमध्ये स्पायडर एंजियोमास तुमच्या त्वचेवर वाढू लागतं. हा प्रकार एखाद्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे दिसू लागतो. स्पायडर एंजियोमास त्वचेच्या खालच्या भागात देखील होऊ शकतं. जेव्हा शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते त्यावेळी ते सहजरित्या दिसून येतं. जर अशी लक्षणं दिसून येत असतील तर तुम्ही तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

त्वचेवर निळ्या रंगाचे चट्टे येणं

जर तुमच्या शरीरावर विविध ठिकाणी निळे चट्टे पडत असतील तर ते यकृताच्या समस्येशी संबंधित असू शकतं. यामधून जर रक्त देखील येत असेल हे एक लिव्हर डॅमेज खराब झाल्याचं लक्षण आहे. यामध्ये शरीराक ब्लड क्लॉटींग रोखण्यासाठी गरजेची असलेले प्रोटीन्स लिव्हरमध्ये योग्य प्रमाणात तयार होत नाहीत. परिणामी असे चट्टे शरीरावर दिसून येतात. शरीरावर असे चट्टे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

लिव्हरची अजून एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. ही समस्या उद्भवल्यास खाली दिलेली लक्षणं तुम्हाला दिसून येऊ शकतात.

  • भूक कमी होते
  • वजनही अचानक कमी होऊ लागतं.
  • डोळ्यांचा रंग पिवळा होऊ लागतो.
  • पायांना थोडी सूज येऊ लागते.
  • सतत थकवा जाणवणं
  • शरीर अशक्त असल्यासारखं वाटत राहणं
  • पोटाच्या वरच्या बाजूला वेदना होणं