2025 Calendar: दिवाळी कधी? गणपती कधी येणार? पाहा यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला

2025 Calendar Important Festivals Dates: नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर अनेकांना आधी कोणता सण कुठल्या तारखेला येतोय हे पाहण्यात विशेष रस असतो. पाहूयात या वर्षी कधी येणार दिवाळी, गणपती अन् इतर सण...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 1, 2025, 08:25 AM IST
2025 Calendar: दिवाळी कधी? गणपती कधी येणार? पाहा यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला title=
नव्या वर्षी किती सारखेला कोणता सण येणार? (फोटो - प्रातिनिधिक)

2025 Calendar Important Festivals Dates: नवीन वर्षाला म्हणजेच 2025 चं जगभरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीनंतर सर्वात आधी डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षी कोणते सण कधी येणार आहेत. मराठी कुटुंबांमध्येही सणवार आधीपासूनच पाहून त्यानुसार नियोजन करणारे अनेकजण आहेत. सामान्यपणे नव्या वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर दिवाळी कधी, गणपती कधी, नवरात्र कधी यासरख्या गोष्टींच्या तारखा आवर्जून शोधल्या जातात. 

नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पाहूयात की आजपासून सुरु होत असलेल्या नव्या वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला साजरा केला जाणार असून त्या सणाच्या दिवशी कोणत वार आहे, हे पाहूयात... 

> मकरसंक्रांती मंगळवार 14 जानेवारी
> छत्रपती शिवजी महाराज जयंती (तारखेनुसार) बुधवार 19 फेब्रुवारी
> महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी
> होळी गुरुवार 13 मार्च
> धूलीवंदन शुक्रवार 14 मार्च

> छत्रपती शिवजी महाराज जयंती (तिथीनुसार) सोमवार 17 मार्च
> छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी शनिवार 29 मार्च
> गुढीपाडवा रविवार 30 मार्च
> रमझान ईद सोमवार 31 मार्च
> श्रीराम नवमी रविवार 6 एप्रिल

> भगवान महावीर जन्म कल्याणक गुरुवार 10 एप्रिल
> बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवार 14 एप्रिल
>  गुड फ्रायडे शुक्रवार 18 एप्रिल
> ईस्टर संडे रविवार 20 एप्रिल
> अक्षय्य तृतीया बुधवार 30 एप्रिल

> महाराष्ट्र दिन गुरुवार 1 मे
> बुद्धपौर्णिमा सोमवार 12 मे
> बकरी ईद शनिवार 7 जून
> वटपौर्णिमा मंगळवार 10 जून
> देवयानी आषाढी एकादशी/ मोहरम रविवार 6 जुलै

> गुरुपौर्णिमा गुरुवार 10 जुलै
> नागपंचमी मंगळवार 29 जुलै
> नारळी पौर्णिमा शुक्रवार 8 ऑगस्ट
> रक्षाबंधन शनिवार 9 ऑगस्ट
> पतेती गुरुवार 14 ऑगस्ट

>  श्रीकृष्ण जयंती शुक्रवार 15 ऑगस्ट
> गोपाळकाला शनिवार 16 ऑगस्ट
> पोळा शुक्रवार 22 ऑगस्ट
> हरितालिका तृतीया मंगळवार 26 ऑगस्ट
> श्रीगणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट

> ऋषिपंचमी गुरुवार 28 ऑगस्ट
> ई-ए-मिलान शुक्रवार 5 सप्टेंबर
> अनंत चतुर्दशी शनिवार 6 सप्टेंबर
> घटस्थापना सोमवार 22 सप्टेंबर
> दसरा गुरुवार 2 ऑक्टोबर

> कोजागरी पौर्णिमा सोमवार 6 ऑक्टोबर
> धनत्रयोदशी शनिवार 18 ऑक्टोबर
> नरक चतुर्दशी सोमवार 20 ऑक्टोबर
> लक्ष्मीपूजन मंगळवार 21 ऑक्टोबर
> बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा बुधवार 22 ऑक्टोबर

> भाऊबीज गुरुवार 23 ऑक्टोबर
> गुरुनानक जयंती बुधवार 5 नोव्हेंबर
> श्रीदत्त जयंती गुरुवार 4 डिसेंबर
> ख्रिसमस/नाताळ गुरुवार 25 डिसेंबर