Protein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष !

प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते? 

Updated: Oct 4, 2022, 02:22 PM IST
Protein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष ! title=

Protin Deficiency: प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते? 

Lack Of Protein Causes These Problems To Body: प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे तुम्ही कमजोर होता. त्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. यापैकी एक प्रोटीन आहे. हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे. जे केवळ स्नायू बळकट करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. एवढेच नाही तर शरीराच्या सर्व वाढीसाठी हे आवश्यक असते. जेव्हा शरीरात प्रोटीनची कमतरता असते तेव्हा व्यक्तीला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की, प्रोटीनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? चला जाणून घेऊया.

प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीरात या समस्या उद्भवतात 

हाडे कमकुवत होणे-
बहुतेक लोक शरीरात प्रोटीनची कमतरता केवळ स्नायूंच्या वस्तुमान किंवा वजनाशी जोडून पाहतात. परंतु प्रथिनांच्या कमतरतेमुळे हाडांवर विपरीत परिणाम होतो आणि ते कमकुवत देखील होऊ शकतात. जेव्हा शरीरात प्रोटीनची कमतरता असते तेव्हा किरकोळ दुखापत होऊनही हाडे तुटण्याचा धोका असतो.

फॅटी लिव्हरची समस्या-
प्रथिनांच्या कमतरतेमुळे यकृतावरही गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे पेशींमध्ये चरबी वाढू लागते. त्यामुळे व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते. फॅटी लिव्हरमुळे, व्यक्तीला थकवा, अशक्तपणा किंवा बरगड्यांच्या खाली दुखण्याची तक्रार असते.

वारंवार संसर्गाची समस्या -  
दरम्यान, बदलत्या ऋतूमध्ये बहुतेक लोक संसर्गाची तक्रार करतात. पण जर तुमच्या शरीरात वारंवार संसर्ग होत असेल तर त्यामागे प्रोटीनची कमतरता कारणीभूत असू शकते. कारण प्रथिनांच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.आम्ही तुम्हाला सांगतो की, खूप कमी प्रथिने खाल्ल्याने तुमच्या शरीराची सामान्य सर्दी सारख्या संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू लागता.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)