मुंबई : मिरचीचा वापर जवळजवळ सर्व प्रकारच्या भाज्या, सॅलडमध्ये केला जातो. मिरच्यांमुळे त्या वस्तूंची चव वाढते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मिरचीच्या काही डिश घेऊन आलो आहोत, जे खाल्ल्यानंतर लोकं तुमची वाह वाही केल्याशिवाय रहाणार नाहीत.
चांगले अन्न हे नेहमीच स्वादिष्ट, समृद्ध आणि मसालेदार असते. जेव्हा मसालेदारपणाचा विषय येतो, तेव्हा कोणत्याही डिशमध्ये मिरची ही येतेच, कारण तो सर्वात महत्वाचा घटक आहे. मिरचीही अनेक प्रकारची असू शकते, त्यांच्यापासून तुम्ही कोणतीही डिश सहज वाढवू शकतात. या मिरच्या म्हणजे जलपेनो, लाल मिरची, थाई मिरची, हिरवी मिरची, शिमला मिरची इत्यादींचा समावेश असतो.
आम्ही मिरचीचे काही पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत ते एकदा बनवुण पाहा
एका पॅनमध्ये अर्धा कप व्हाइट व्हिनेगर, अर्धा कप पाणी, 2 चमचे मीठ आणि अर्धा कप साखर मिसळा. एका भांड्यात 500 ग्रॅम चिरलेली मिरची आणि 2 तमालपत्र ठेवा. आता हे व्हिनेगर मिश्रण मिरचीवर ओता.
झाकणाने जार घट्ट बंद करा आणि खोलीच्या तपमानावर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिरची फ्रीजमध्ये ठेवा. याला तुम्ही कधीही खाऊ शकता.
मसालेदार मिरची पेस्ट बनवण्यासाठी फक्त 7-8 सुक्या लाल मिरच्या, लसणाच्या 6-7 पाकळ्या, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 चमचे मीठ आणि 2 चमचे पाणी घ्या. पेस्ट बनवण्यासाठी सगळे साहित्य मिक्सरमध्ये लावा. आता कढईत थोडे तेल गरम करा आणि ही पेस्ट त्यामध्ये घाला. मोठ्या आचेवर काही मिनिटे शिजवा. तुमची मिरची पेस्ट तयार आहे.
1 कप चण्याचं पिठ घ्या त्यात, 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, लाल तिखत 1 चमचा, लिंबू अर्धा, मिठ चविनुसार घ्या आणि सगळं एकत्र मिक्स करा. त्यात गरजेनुसार पाणी घाला. मिश्रण जास्त पातळ होऊ देऊ नका. आता भोपळी किंवा सिमला मिरची घ्या त्याला वरुन देठाचा भाग कापा आणि सगळ्या बिया बाहेर काढा. त्यानंतर त्यात हे मिश्रण भरा. कढईत थोडं तेल घ्या आणि त्यात या मिरच्या ठेवा. त्यावर झाकण ठेवा. 15-20 मिनिटं मंद आचेवर ठेऊन यांना शिजवा.