Dandruff Remedies: केसांना फक्त तेल लावल्याने वाढू शकतो डँड्रफ; वाचा खास उपाय

कोंड्याची समस्या असताना केसांना तेल लावणं फायदेशीर मानलं जातं. 

Updated: Aug 27, 2021, 12:18 PM IST
Dandruff Remedies: केसांना फक्त तेल लावल्याने वाढू शकतो डँड्रफ; वाचा खास उपाय title=

मुंबई : डोक्याच्या त्वचा म्हणजे स्कॅल्प कोरडी पडल्यावर डँड्रफ होण्याची समस्या जाणवते. ज्यासाठी केसांना तेल लावणं फायदेशीर मानलं जातं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोंड्यावर उपाय करण्यासाठी फक्त केसांना तेल लावणं योग्य नाही. कारण, यामुळे डोक्यातील कोंडा वाढू शकतो. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, केसांना तेल लावण्यापूर्वी तुम्ही या उपायांचा अवलंब करावा.

डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी कांद्याचा रस

जर तुम्ही बऱ्याच काळापासून डोक्यातील कोंडाच्या समस्येने त्रस्त असाल तर कांद्याचा रस डोक्यात लावा. केसांना तेल लावण्यापूर्वी कोंडा कमी करणं महत्वाचं आहे. कांद्याचा रस डोक्यातील कोंडा दूर करण्याबरोबरच केस मजबूत करेल. कांद्याचा रस टाळूवर लावा आणि 20 मिनिटांनी माईल्ड शॅम्पूने डोकं धुवा. आठवड्यातून किमान दोनदा डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी हा उपाय करा.

मधाचा वापर

कोंडा दूर करण्यासाठी मध वापर करणं हा एक सोपा मार्ग आहे. हे स्कॅल्पला पोषण आणि मॉइस्चराइजिंग करण्यास मदत करतं. यासाठी तुम्ही 1 चमचा गुलाबाचे पाणी 1 चमचा मधात मिसळा आणि नंतर हलक्या हाताने टाळूचं मालिश करा. केसांवर मध आणि गुलाब पाण्याचे थोडे मिश्रण लावा. 20 मिनिटांनी शॅम्पू करा.

एलोवेरा रस

कोरफडांचा रस देखील कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी ताज्या कोरफडीचा रस घ्या आणि केसांच्या मुळांवर तसंच टोकांवर लावा. तुम्ही हलक्या हातांनी मालिश देखील करा शकता. कोरफडीचा रस केसांना लावल्यानंतर 20 मिनिटांनी केस माईल्ड शॅम्पूने धुवा. हे आठवड्यातून दोनदा करा.