आहारात 'या' 3 भाकऱ्यांचा समावेश वजन कमी करण्यास ठरेल फायदेशीर

आहारात अशा गोष्टी घ्या ज्यामुळे वजन वाढत नाही आणि तुम्हाला पोषक तत्वं देखील योग्य प्रकारे मिळतात.

Updated: Aug 17, 2022, 07:51 AM IST
आहारात 'या' 3 भाकऱ्यांचा समावेश वजन कमी करण्यास ठरेल फायदेशीर title=

मुंबई : खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या अधिक प्रमाणात दिसून येतोय. बरेचदा लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंगचा अवलंब करतात. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं नाही तर वजन वाढू लागतं. वजन कमी करण्यासाठी योग्य जीवनशैलीचा अवलंब करणं आवश्यक आहे, तर आहाराचीही गरज आहे. पण आहारात अशा गोष्टी घ्या ज्यामुळे वजन वाढत नाही आणि तुम्हाला पोषक तत्वं देखील योग्य प्रकारे मिळतात.

नाचणीची भाकरी

रागीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. रोजच्या आहारात नाचणीचा समावेश केल्यास अनेक आजार दूर होतात. नाचणीमध्ये भरपूर फायबर असते. त्यात भरपूर फायबर असले तरी ते अमीनो आम्ल आणि ग्लूटेन मुक्त आहे. याचं दररोज सेवन केल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. नाचणीचं पीठ जास्त काळ पोट भरण्यास मदत करतं. 

बाजरीची भाकरी

बाजरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजरीमध्ये फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, आयर्न मुबलक प्रमाणात आढळतं. हे तुमचं वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. बाजरीच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. याच्या रोजच्या सेवनाने शरीरातील अनेक आजार दूर होतात, तसंच वजनंही वाढत नाही.

ज्वारीची भाकरी

ज्वारीचे सेवन करण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतीलच. ज्वारीचं सेवन आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तापामध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्वं आढळतात. ज्वारीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, तर याच्या सेवनाने पोटाचं आरोग्यही सुधारते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ज्वारीचं सेवन खूप चांगले आहे.