हिवाळ्यात आहारात या गोष्टींचा करा समावेश, आजारांपासून राहाल दूर

हिवाळ्यात थंडी वाढल्याने त्याप्रमाणे आहारात देखील बदल करावा लागतो. त्यामुळे खालील गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.

Updated: Dec 4, 2021, 10:42 PM IST
हिवाळ्यात आहारात या गोष्टींचा करा समावेश, आजारांपासून राहाल दूर title=

मुंबई : हिवाळा सुरु झाला की थंडीची चाहूल लागते. थंडी जाणवणे सामान्य आहे, परंतु काही लोकांना या ऋतूमध्ये खूप थंडी जाणवते. जर तुमच्याबाबतीतही असे होत असेल तर तुमच्या आहारात काही गोष्टींचा अवश्य समावेश करा.

हिरवी मिरची

आपल्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडणे टाळू शकाल.

शेंगदाणा

पोषक तत्वांनी युक्त शेंगदाणे खाल्ल्याने हिवाळ्यातही तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला जास्त सर्दी होत असेल तर रोजच्या आहारात याचा समावेश करा.

कांदा

विशेषत: या ऋतूत कांद्याचा आहारात समावेश करा. कांद्यामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

हळद

हळदीचा प्रभाव उष्ण असतो. हिवाळ्यात हळदीचे दूध प्यायल्यानेही फायदा होईल.

अद्रक

आहारात आल्याचाही समावेश करा. तुम्ही ते चहा किंवा भाजीमध्ये टाकू शकता किंवा पाण्यात उकळल्यानंतर ते पिऊ शकता.