'या' उपायाने मिनिटाभरात झोपी जाण्यासाठी मेंदुला द्या संकेत !

उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, व्यायाम हा आवश्यक असतो. 

Updated: May 5, 2018, 08:08 PM IST
'या' उपायाने मिनिटाभरात झोपी जाण्यासाठी मेंदुला द्या संकेत !  title=

 मुंबई : उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, व्यायाम हा आवश्यक असतो. सोबतच रात्रीच्या वेळेस 7-8 तास शांत झोपही आवश्यक आहे. मात्र अनेकांना आजकाल शांत झोप मिळणं कठीण झाले आहे. अनेकांना आज निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे.  रात्रीच्या वेळेस शांत झोप मिळवण्यासाठी अनेक औषधोपचार, हळद किंवा जायफळ घातलेले दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्ही मेंदुलाच वेळेत झोपी जाण्याचे संकेत दिल्यास तुम्हांला इतर उपायांची मदत घेण्याची गरजच पडणार नाही.  

 कसे द्याल मेंदुला संकेत ?  

 शांत झोप मिळवण्यासाठी तुम्हांला केवळ श्वासावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. याकरिता श्वासावर 4-7-8  हे ब्रिदिंग टेक्निक वापरणं फायदेशीर ठरते.  

 कसा कराल हा उपाय   

 श्बसनाचे व्यायाम करण्यापूर्वी योग्य स्थितीत बसणं आवश्यक आहे. याकरिता ताठ बसा, खांदे रिलॅक्स स्थितीत ठेवा. 
 
 तुमची जीभ पहिल्या दाताच्या मागच्या बाजूला चिकटवा. श्वास घेताना आणि सोडतानाही जीभ याच स्थितीत ठेवणं आवश्यक आहे. 
 
 नाकाने श्वास घ्या. यादरम्यान 4 काऊंट करा. 
 
 त्यानंतर 7 काऊंटसाठी श्वास रोखून ठेवा. 
 
 तोंडाने श्वास सोडताना 8 काऊंट करा. 
 
 हा श्वसन व्यायाम तीन वेळेस करा. 
 
 नियमित हा व्यायाम केल्याने तुमच्या शरीराला,मेंदूला याची सवय होईल.  

 काय होतात फायदे?   

 दीर्घ श्वसन केल्याने शरीरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन जातो. यामुळे शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होते. ताण तणाव, भीती कमी होण्यास मदत होते.