मुंबई : प्रत्येत ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यात केसांची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होत जाते. म्हणून आपण हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची...
हिवाळ्यात दररोज केस धुने शक्य नाही. त्यामुळे केसं खराब होण्याची शक्यता जास्त असते. केसांच्या समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हलक्या शॅम्पुने केसं धुवा आणि कंडीशनर करणे विसरू नका.
डोक्यातील कोंड्यामुळे केसं कमकुवत होतात. हिवाळ्यात कोंड्याची समस्या मोठ्या प्रमाणात डोकं वर काढते. म्हणून डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी नियमितपणे डोक्यात तेल लावणे आवश्यक असते.
तेल मालिश देखील महत्त्वाची आहे. जसे शरीराला पौष्टिक आहार आवश्यक असते. तसेच केसांची सुध्दा योग्य निगा राखने आवश्यक असते. हिवाळ्यात केसांची पुर्णपणे काळजी घेतली तर केसांची स्थिती चांगली होत जाते.
हिवाळ्यात केस ड्राय होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेर जातांना केसांना स्कार्फने झाकून बाहेर पडावे. हिवाळ्यात केसांना जास्त स्प्लिटस पडतात. त्यामुळे अधुन मधून केसांना ट्रीम करत राहा. म्हणजे केस हेल्दी राहतील.