मुंबई : जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
जेवताना पाणी पिणे ही सवय अनेकांना लहानपणापासून असते. या सवयीपासून लगेजच सुटका मिळणे शक्य नाही. परंतू या काही साध्या-सोप्या टीप्सने तुम्ही यावर मात करू शकता.
मीठामुळे आपल्याला सतत तहान लागते. त्यामुळे आहारात आवश्यक तेवढाच मीठाचा वापर करा. अळणी जेवणात वरून मीठ घालू नका.
‘प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा.’ असे म्हटले जाते. कारण अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मीतीला चालना मिळते व पचनही सुधारते. तसेच अन्न चावून खाल्ल्याने त्याचे विघटन आणि पचन सुधारते. याबरोबरच अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मिती वाढते आणि पाणी पिण्याची इच्छा कमी होते.
एक्सपर्ट सल्ल्यानुसार, वजन घटवण्यासाठी तसेच उत्तम मेटॅबॉलिक रेटसाठी जेवणापूर्वी 30 मिनिटे अगोदर साधे पाणी प्यावे. यामुळे जेवताना पाणी पिण्याची इच्छा कमी होते.