मुंबई : एखाद्या व्यक्तिने आपली आठवण काढली की आपल्याला उचकी लागते, असा समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही. छातीच्या पिंजर्याचा विभाजक पडदा ( डायफ्रॅम) स्नायूंनी बनलेला असतो. कधी कधी अचानक या स्नायूंचे आकुंचन होते. ही क्रिया अनैच्छिक असते. वारंवार आकुंचन झाल्याने, स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ येतात व उचकी निर्माण होते. उचकी काही काळासाठी ठराविक अंतराने येते व आपोआप बंद होते. मात्र काहींमध्ये उचकी दीर्घकाळ राहते. अशावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणेच हितकारी आहे.