Health Care Tips: उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघाताची सर्वाधिक जोखीम अधिक असते. अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. लहान मुलं शारीरिकदृष्ट्या खूप नाजूक असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात. मुलांची त्वचा नाजूक असते तेव्हा त्यावर प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम होऊन त्वचा पोळली जाते व काळी पडण्याची शक्यता असते.
खारघरच्या रूग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत मोरलवार यांनी सांगितलं की, उघड्या अन्नावरील विषाणू आणि विषाणूयुक्त पाणी यातून आजार जडतो. तसंच दूषित बर्फामधून याचा फैलाव होत असतो. मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. उलट्या किंवा तापाची लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.