सकाळी नाश्ता न करण्याचे धोकादायक परिणाम

चांगल्या आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता राजासारखा असावा असे सांगितले जाते. 

Updated: Jul 26, 2018, 04:53 PM IST
सकाळी नाश्ता न करण्याचे धोकादायक परिणाम  title=

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता राजासारखा असावा असे सांगितले जाते. सकाळचा नाश्ता मजबूत केल्यानंतर त्याहून कमी दुपारचे जेवण आणि अत्यल्प रात्रीचं जेवण घ्यावे असे सांगितले जाते. पण सकाळी घाईगडबड असल्याने अनेकजण नाश्ता न करताच घराबाहेर पडतात. मात्र ही एक चूक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. 

नाश्ता न करण्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम  

मेटॅबॉलिझमचे कार्य बिघडते 

सकाळी नाश्ता न केल्याने शरीरात मेटॅबॉलिझमचे कार्य बिघडते. परिणामी कॅलरी बर्न होण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. 

मधुमेहाचा धोका 

एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, सकाळी नाश्ता न केल्याने मधुमेहाचा धोका बळावतो. महिलांमध्ये टाईप 2 मधुमेह बळावण्याची शक्यता सुमारे 20 %  वाढते.  

वजन वाढतं - 

नाश्ता न करण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्याचा धोका बळावतो. एका अभ्यासानुसार, उपासमार केल्याने वजन वाढू शकते. ब्रेकफास्ट न केल्याने दुपारचे आणि रात्रीचे जेवण अधिक खाल्ले जाते. म्हणून नाश्ता करण्याची सवय सोडू नका.  

मूड सुधारतो -  

नियमित ब्रेकफास्ट करण्याची सवय असणार्‍यांमध्ये मूड चांगला राहतो. दिवसाची प्रसन्न सुरूवात होते सोबतच दिवसभरासाठी उर्जा मिळते.