'सिनेमागृहात चित्रपटाचे प्रदर्शन ठरली मोठी चूक...', 'इमरजेंसी' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काय म्हणाली कंगना रनौत?

कंगनाने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत आपल्या 'इमरजेंसी' या चित्रपटाविषयी अनेक गोष्टींचा  खुलासा केला. 

Updated: Jan 9, 2025, 05:53 PM IST
'सिनेमागृहात चित्रपटाचे प्रदर्शन ठरली मोठी चूक...', 'इमरजेंसी' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काय म्हणाली कंगना रनौत? title=

Kangana Ranaut Film Emergency: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौत हीने आपल्या अभिनयाने बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:ची छाप तर सोडलीच मात्र या व्यतिरिक्त तिने राजकारणात सुद्धा स्वत:ची ओळख निर्माण केली. अशातच आता कंगना रनौतचा 'इमरजेंसी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

'इमरजेंसी' हा चित्रपट मागील वर्षीच प्रदर्शित होणार होता. परंतु, काही कारणास्तव तो तेव्हा होऊ शकला नव्हता. मात्र, आता हा चित्रपट 17 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला घेऊन चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. कंगना या दिवसात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसत आहे. 

प्रमोशनदरम्यान झालेल्या एका मुलाखतीत कंगनाने चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात आपले मत व्यक्त केले. सिनेमागृहातील तिच्या चित्रपटाचे प्रदर्शन ही एक चूक ठरली असल्याचं कंगनाने या मुलाखतीत सांगितलं. कंगनाच्या मते, चित्रपटाला सिनेमागृहात प्रदर्शित करणे ही चूक ठरु शकते कारण जर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असता तर त्याचा अधिक फायदा झाला असता. मागील वर्षीच 'इमरजेंसी' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काही बदल करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे हा चित्रपट यावर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनावर काय म्हणाली कंगना?

सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या सल्ल्यानुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटात बदल केले आणि आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या या प्रदर्शनासंबंधी कंगनाने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'सिनेमागृहातील चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाचे परिक्षण केले जाते आणि याच कारणामुळे मला भिती वाटत होती. त्यावेळी मला असे वाटले की, सिनेमागृहातील चित्रपटाचे प्रदर्शन चूकीचे ठरु शकते. त्याऐवजी जर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला असता तर ते जास्त फायद्याचं ठरलं असतं. कारण CBFC चित्रपटात काय बदल करेल, हे मला माहित नव्हतं.'

 

तरुणांना आश्चर्यचकित करणारा चित्रपट

कंगना या चित्रपटाविषयी संवाद साधताना म्हणाली, 'मी याआधी 'किस्सा कुर्सी का' या माझ्या चित्रपटाविषयी सुद्धा बोलले होते. कोणीच हा चित्रपट आजपर्यंत पाहिला नाही आणि आधीसुद्धा कधी पाहिला नव्हता कारण या चित्रपटाच्या सर्व प्रींट्स जाळण्यात आल्या होत्या. तसेच, इंदिरा गांधींवर याआधी कधीच चित्रपट बनवला गेला नाही. त्यामुळे 'इमरजेंसी' हा चित्रपट पाहून आजचे तरुण नक्कीच थक्क होतील आणि त्यांना इंदिरा गांधींचा पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास पाहता येईल तसेच त्यांच्या तीन वेळा पंतप्रधान होण्यामागचं कारण सुद्धा स्पष्ट  होईल.'

चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान आल्या बऱ्याच अडचणी 

चित्रपटाच्या निर्मितीपासून ते त्याच्या प्रदर्शनापर्यंत 'इमरजेंसी' या सिनेमाच्या टीमला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते, असं कंगना म्हणाली. अनेक अडचणी येऊन सुद्धा कंगना आणि तिच्या टीमने माघार घेतली नाही. त्यांनी त्या अडचणींचा सामना केला. तसेच हा चित्रपट कित्येक इतिहासकार आणि विविध तज्ज्ञांनी पाहिला आणि त्यांना या चित्रपटात काही गैर वाटलं नसल्याचं कंगनाने स्पष्ट केलं. या चित्रपटावर अनेकांनी टीका सुद्धा केल्या मात्र यावर योग्य ते उत्तर दिल्याचं कंगनाने सांगितलं.