Cholesterol : अयोग्य जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेक आजार जडतता. चुकीच्या आहारामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. मुळात कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) हे दोन प्रकारचे असतात. यामध्ये हाय डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि बॅड कोलेस्ट्रॉलला लो डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) यांचा समावेश आहे.
कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) हा एक प्रकारचा चरबी आहे जो यकृताद्वारे तयार होतो. ज्यावेळी स्निग्ध पदार्थ, जंक फूड हे पदार्थ शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त होतात, तेव्हा ते शिरामध्ये जमा होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण नीट होत नाही. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊन हृदयाचा झटका म्हणजे हार्ट अटॅकचा ( Heart Attack ) धोका प्रचंड वाढतो.
LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल 100 mg/dL पेक्षा कमी असलं पाहिजे. जर यामध्ये वाढ असेल तर सावध राहण्याची गरज आहे. जर कोलेस्टेरॉलचे प्रमाण 130 mg/dL किंवा त्याहून अधिक झाले तर ती बॉर्डर लाईन मानली जाते. जर ते 190 mg/dL पेक्षा जास्त असेल तर ते अतिशय धोकादायक मानले जाते. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
मानवी शरीरात HDL चं प्रमाण कमी होणे चांगले नाही. शरीरातील HDL ची पातळी 60 mg/dL किंवा त्याहून अधिक असली पाहिजे. 40 mg/dL किंवा त्यापेक्षा कमी याचं प्रमाण असेल तर ते फार कमी मानलं जातं.
खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं चुकीचं खाणं आणि दुसरं म्हणजे शारीरिक हालचाली न होमं. मुळात आपण दिवसभरात जे काही खाणं खातो ते पचवणंही आवश्यक असतं. जर असं झालं नाही तर शरीरात चरबी वाढून कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.