मुंबई : दातदुखी अत्यंत वेदनादायी असते. एकदा दात दुखायला लागला की काही सुचत नाही. त्यावर काही सोपे उपायही आहेत. पण ते अनेकदा आपल्याला माहीत नसतात. असेच काही स्वयंपाकघरातील पदार्थ दातदुखीवर गुणकारी ठरतात. पाहुया कोणते आहेत ते पदार्थ...
दातदुखीमुळे त्रासले आहात का? मग त्यावर सोपा उपाय म्हणजे चार थेंब मोहरीच्या तेलात चिमुटभर मीठ घालून दात आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे फक्त दातांच्या दुखण्यावर आराम मिळणार नाही तर हिरड्या देखील मजबूत होतील. त्याचबरोबर मोहरीचे तेल नियमित दातांवर लावल्यास दातांची चमकही टिकून राहील.
अन्नपदार्थांमध्ये किंवा सलाडमध्ये कांद्याचा वापर केला जातो. पण कांद्याचा वापर दातदुखीवरही होतो, हे अनेकांना माहित नाही. कांद्याचा एक स्लाईस तीन मिनिटे तोंडात धरून ठेवल्यास तोंडातील किटाणू मरून जातात आणि दातदुखीवर आराम मिळतो.
लसणात अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पोटदुखी आणि रक्ताभिसरणासाठी लसूण फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर दातदुखीवरही लसूण हा एक रामबाण उपाय आहे. लसणात असलेल्या अॅँटीबॅक्टीरीअल गुणधर्मांमुळे दातदुखीवर आराम मिळतो. त्यासाठी लसणाची एक पाकळी किसून किंवा मीठात मिसळून तोंडात ठेवल्यास दातदुखीवर लाभदायी ठरते.
लवंगात अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे बॅक्टेरिया आणि अन्य किटाणू नष्ट होतात. दातदुखीचा खूप त्रास होत असल्यास लवंगाचे तेल लावल्यास खूप फायदा होतो.
टी बॅगचा उपयोग दातदुखीवर होतो, हे अनेकांना ठाऊक नसेल. मात्र दातदुखीवर, हिरड्यांच्या सुजण्यावर टी बॅगचा वापर करता येतो.