जायफळाने टाळा निद्रानाशाची समस्या

  जायफळ हे गरम मसाल्यातील एक प्रमुख घटक. चिकन, मटणासारखे मांसाहारी पदार्थ असोत किंवा सणासुदीचे गोडाचे पदार्थ, ‘जायफळा’ शिवाय या पदार्थांना रंगतच नाही. पण पदार्थांची चव वाढवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. तज्ञांच्यामते, जायफळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचेची कांती सुधारते तसेच पचनाचे विकारही कमी होतात.

Updated: Mar 12, 2018, 10:36 PM IST
जायफळाने टाळा निद्रानाशाची समस्या  title=

मुंबई :  जायफळ हे गरम मसाल्यातील एक प्रमुख घटक. चिकन, मटणासारखे मांसाहारी पदार्थ असोत किंवा सणासुदीचे गोडाचे पदार्थ, ‘जायफळा’ शिवाय या पदार्थांना रंगतच नाही. पण पदार्थांची चव वाढवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. तज्ञांच्यामते, जायफळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचेची कांती सुधारते तसेच पचनाचे विकारही कमी होतात.

निद्रानाशासारख्या दिवसेंदिवस गंभीर होत जाणार्‍या आजारावर  जायफळ फार गुणकारी आहे. आजीबाईच्या बटव्यातील या औषधाला आता विविध संशोधनांचा पाठिंबा मिळाला आहे. जायफळ खाल्ल्याने शरीरात सेरोटीनचे प्रमाण वाढते व शरीर आरामदायी बनते असे संशोधनातून समोर आले आहे. तसेच जायफळामुळे ताणतणाव हलका होतो व शांत झोप मिळण्यास मदत होते. जायफळाच्या या गुणधर्मांमुळे निद्रानाशावर मात करणे शक्य होते.

कसा कराल जायफळाचा आहारात समावेश:

निद्रानाश टाळण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दुधात चिमूटभर जायफळाची पूड व साखर मिसळून दुध प्यावे.
भाज्या किंवा आमटीमध्ये जायफळीची पूड घालावी.
गोडाचे पदार्थ,स्मुदी अशा पदार्थांमध्ये वेलची सोबतच जायफळीची पूड घालावी. यामुळे चवही वाढते आणि निद्रानाशावर मातही होते.