कार, बसमधून प्रवास करताना होणारा उलट्यांचा त्रास या ६ टिप्सने दूर करा!

काही लोकांना कार किंवा बसमधून प्रवास करताना डोकेदुखी, उलट्या होणे असे त्रास सुरु होतात. 

Updated: Apr 24, 2018, 05:59 PM IST
कार, बसमधून प्रवास करताना होणारा उलट्यांचा त्रास या ६ टिप्सने दूर करा! title=

मुंबई : काही लोकांना कार किंवा बसमधून प्रवास करताना डोकेदुखी, उलट्या होणे असे त्रास सुरु होतात. तुम्हालाही असा त्रास होतो का? पण हा त्रास टाळणार कसा? किंवा त्यावर नेमका उपाय काय? तर या साध्या सोप्या टिप्सने तुम्ही कार-बसमधून प्रवास करताना होणारा त्रास दूर करु शकता.

१. कारमध्ये बसल्यावर त्रास होत असल्यास हलका आणि दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे बैचेन वाटणे दूर होण्यास मदत होईल.

२. कारमध्ये मागे बसल्यास काहींना त्रास होतो. अशावेळी समोरच्या सीटवर बसा आणि इकडे तिकडे न बघता समोरच बघा.

३. मोशन सिकनेस कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे पेपरमिंट/पुदिना. मिंटच्या तेलाचे काही थेंब रुमालावर घेऊन रुमाल नाकाला लावून श्वास घ्या. यामुळे आराम मिळेल. पुदिन्याचा चहा पिणेही फायदेशीर ठरेल.

४. आल्याच्या गोळ्या किंवा आल्याचा चहा देखील मोशन सिकनेसवर परिणामकारक ठरेल.

५. प्रवास करताना वाचन किंवा लेखन करणे टाळा. त्याऐवजी गाणी ऐका.

६. डोके मागे टेकून आरामदायी स्थितीत बसा. गाडीच्या काचा बंद करण्यापेक्षा उघड्या ठेवल्यास मोकळी हवा मिळेल. या सर्व उपायांनी काही फरक न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.