दह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. 

Updated: Apr 24, 2018, 03:38 PM IST
दह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !  title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. लस्सी, ताक, योगर्ट अशा विविध स्वरूपात दह्याचा आहारात समावेश केला जातो. मात्र दह्याचे आरोग्यदायी फायदे असले तरीही काही पदार्थांसोबत दही खाणं हे आरोग्याला नुकसानकारकही ठरू शकते. दह्यासोबत काही चुकीचे खाल्ल्यास पोटात गडबड होणं, पचनकार्यामध्ये बिघाड होणं, उलट्या होणं, मन अस्वस्थ होणं अशा समस्या वाढतात. सावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही

दह्यासोबत कोणते पदार्थ खाणं टाळायलाच हवेत 

आंब्यासोबत दही - 

उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना दही खाणं पसंत आहे. मात्र आंब्यासोबत दही खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. दही नैसर्गिकरित्या थंड स्वरूपाचं आणि आंबा उष्ण असतो. त्यामुळे या दोघांना एकत्र खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं. कारण यामुळे शरीरात विषारी घटकांची निर्मिती होते.   'या' आरोग्यदायी फायद्यांंसाठी आजपासून आंंब्यावर ताव मारा

चीझसोबत दही - 

चीझसोबत दही खाणं आरोग्याला त्रासदायक आहे. आयुर्वेदामध्ये यांना एकत्र खाणं नुकसानकारक असल्याचे सांगितले जाते. चीझ आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीरात दोष निर्माण होऊ शकतात. म्हणूनच दह्यासोबत चीझ खाऊ नका.  

इडली डोसा -

इडली, डोसा हे पदार्थ आंबवून बनवले जातात. इडली,डोसा हे पदार्थ दह्यासोबत खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. इडली, डोसा हे पदार्थ सांबार किंवा खोबर्‍याच्या चटणीसोबत खाल्ल्यास आरोग्यदायी ठरतात. या '5' ट्विस्टने इडली बनवा अधिक टेस्टी

केळं - 

दह्यासोबत केळं खाणंदेखील आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. दह्यासोबत केळं खाणं  आरोग्यामध्ये अनेक बिघाड करण्यास कारणीभूत ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्टसच्या सल्ल्यानुसार, केळं आणि दही एकत्र खाल्ल्याने फ्लोरियाचा त्रास होऊ शकतो. केळं आणि दही एकत्र कधीच खाऊ नये. हे दोन्ही वेगवेगळ्या वेळेत खाणं अधिक फायदेशीर आहे. केळं आणि दही खाण्यामध्ये दोन तासांचा फरक असणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का ?

उडीद डाळ - 

उडीद डाळीसोबत दही खाणं आरोग्यासाठी विषारी ठरू शकतं. उडीद डाळीच्या खिचडीसोबतही दही खाणं आरोग्याआ नुकसानकारक ठरतं. शरीरात यामुळे आम्ल म्हणजेच पित्त निर्माण होण्यास कारणीभूत ठरतं. यामुळे पचनक्रियेमध्ये बिघाड निर्माण होतो. सोबतच अनेक समस्या निर्माण होतात.