Burnt Tongue Home Remedies : बऱ्याचवेळा आपण पटपट जेवतो आणि गरम गरम जेवण केल्यानं जीभ भाजते. इतकंच काय तर अन्न पचनाची प्रक्रिया देखील हळू होते. काही लोक जेवताना घाई-घाईत खातात आणि अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अनेक लोक आहेत ज्यांना गरम खायला आवडतं. पण थोडं जरी गरम खाल्ले तरी त्यांना तोंड येत किंवा मग अल्सर येतं. त्यामुळे अनेकांना जेवण करताना आनंद होत नाही. तर अपचनाच्या समस्येमुळे देखील कमी जेवतात. पण तुम्हाला माहितीये का जेव्हा आपली जीभ भाजते तेव्हा आपण डॉक्टरकडे न जाता अनेक घरगुती उपाय करू शकतो. चला तर आज आपण त्या उपायांविषयी जाणून घेणार आहोत....
च्युइंगम खा
च्युइंगम का खायला हवं असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण च्युइंगम खातो तेव्हा आपल्या तोंडात नेहमीपेक्षा जास्त लाळेची निर्मिती होती. त्यामुळे जर जीभ भाजली असेल आणि तिच्यावर सतत आपली लाळ असेल तर आपल्याला जळजळ होत नाही किंवा कमी होते.
जीभ भाजल्यावर खा मध
मधात अनेत औषधी गुणधर्म असतात. जीभ भाजेल तेव्हाच नाही तर दैनंदिन जीवनातही तुम्ही मध खाऊ शकता. पण जीभ भाजली असेल तर त्यानं होणारी जळजळ तुम्ही मधाच्या मदतीनं कमी करू शकतात. जर तुम्ही एक चमचा मध हे जिभेवर ठेवले तर तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. दिवसातून पाच ते सहा वेळी असं करण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा : 'मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी...', Priyanka Chopra च्या धर्मावर निक जोनसचं वक्तव्य
आईस्क्रीम
आईस्क्रीम हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. आईस्क्रीम मला नको किंवा मला आवडत नाही असं बोलणारी एकही व्यक्ती आपल्याला भेटणारी नाही. आता आईस्क्रिम खाण्याची संधी शोधत असाल तर जीभ भाजली असेल तर तुम्ही आईस्क्रिम खायाला हवी. त्यामुळे जिभेवर असलेली सूज आणि जळजळ कमी होते.
दही
दही हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात रोज दही खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशात जीभ भाजलेल्यांनी दहीचे सेवन केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दह्याचे इतर फायदेही आहेत.
थंड पाणी प्या
जीभ भाजली असेल तर तुम्ही सतत थंड पाणी प्या अशानं जिभेला होणारी जळजळ नक्कीच कमी होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)