Cough Syrup संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 1 जूनपासून नवीन नियम लागू

Cough Syrup Export Guidelines : भारतातून परदेशात निर्यात करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे गेल्या वर्षी अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारतातील वैद्यकीय उत्पादनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

श्वेता चव्हाण | Updated: May 23, 2023, 03:39 PM IST
Cough Syrup संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 1 जूनपासून नवीन नियम लागू  title=
Cough Syrup Export Guidelines

Cough Syrup Export Guidelines in Marathi : भारतीय कंपन्यांचे कफ सिरप (Cough Syrup) देऊन गॅम्बिया आणि उझबेकिस्तानच्या डझनभर मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी केला होता.  अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात तयार होणाऱ्या कफ सिरपची निर्यातीपूर्वी त्याची प्रयोगशाळेत चाचणी केली जाईल. त्यानंतर संबंधित कंपनीला प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर निर्यातीची परवानगी दिली जाईल. हा निर्णय 1 जूनपासून लागू होणार असून सर्व कफ सिरपच्या निर्यातीपूर्वी चाचणी होणार आहे.

1 जूनपासून नवा नियम लागू

परदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एक अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये उत्पादनाच्या नमुन्याची प्रथम प्रयोगशाळेत चाचणी करावी लागेल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर कफ सिरप निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. हा नवा नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत.

सरकारी प्रयोगशाळांमध्ये होणार चाचणी

खोकल्याच्या औषधाचे नमुने सरकारी प्रयोगशाळांमध्ये अनिवार्यपणे तपासले जातील, असे डीजीएफटीचे म्हणणे आहे. चाचणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. अनेक शहरांमधील प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा, कोलकाता येथील केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा आणि केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळेतील नमुने तपासले जातील. याशिवाय राज्य सरकारने मान्यता दिलेल्या औषध चाचणी प्रयोगशाळांमध्येच नमुने तपासता येतील.

केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत कफ सिरपची चाचणी केली जाणार आहे. यामध्ये चंदीगड, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, गुवाहाटी येथील प्रयोगशाळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय कंपनीने बनवलेल्या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकॉलच्या वापराबद्दल सांगितले होते. हे कारच्या ब्रेक फ्लुइडवर लावले जातात. याबद्दल जागतिक संघटनेने सांगितले की, यामुळे कप सिरप घातक ठरु शकल्याचा इशार दिला होता. 

अनेक बालकांच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा निर्णय

भारतात बनवलेल्या कफ सिरपच्या गुणवत्तेबाबत जगभरातून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अखेर यासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला. गेल्या वर्षी, गांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनुक्रमे 66 आणि 18 मुलांचा मृत्यू झाला होता. यासाठी भारतीय बनावटीचे कफ सिरप कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्याच वेळी 2021-22 किंवा आर्थिक वर्षात भारतातून $17 अब्ज किमतीच्या कफ सिरपची निर्यात करण्यात आली होती. आणि तीची रक्कम 2022-23 मध्ये $17.6 अब्ज इतकी वाढली आहे.