मुंबई : आपल्या शरीरात नसांचं जाळं असतं, जे सर्व अवयवांना पोषण आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतात. परंतु काही अयोग्य पदार्थ खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं आणि नसा ब्लॉक होतात. या घातक पदार्थांचे सेवन वेळीच बंद केले नाही तर कोलेस्ट्रॉल जमा होऊन रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. परिणामी यामुळे मृत्यू होऊ शकतो.
शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल वाढण्याचं कारण म्हणजे अयोग्य अन्नाचं सेवन. अनहेल्दी फुडमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढतं, ज्यामुळे शिरा ब्लॉक होतात. ब्लॉक केलेल्या शिरा रक्तप्रवाह थांबवतात आणि त्या फुटण्याचा धोका असतो.
तरुण वयात कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे फास्ट फूडचं सेवन. अनेक संशोधनांमध्ये असं समोर आलं आहे की, फास्ट फूड खाल्ल्याने नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
भारतात मोठ्या प्रमाणावर तळलेले अन्न वापरले जातात. सणासुदीला पुरी-भाज्या, पकोडे इत्यादींचा ट्रेंड जास्त आहे. पण या तळलेल्या पदार्थांसोबत फ्राय, बर्गरसारखे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. हे कोलेस्टेरॉल हृदय आणि मेंदूसाठी अत्यंत घातक आहे.
फुल फॅट बटर, दूध, चीज, क्रीम इत्यादींचं सेवन केलं तरी कोलेस्टेरॉल वाढू शकतं. दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करू नये. त्याऐवजी तुम्ही लो फॅट डेयरी प्रोडक्ट वापरू शकता.