Health Benifits : या भाजीत आहेत 20 पेक्षा जास्त पोषक तत्त्वं, खाल तर निरोगी राहाल...

मुळापासून ते अगदी फळापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत पोषक

Updated: Oct 1, 2022, 09:17 AM IST
Health Benifits : या भाजीत आहेत 20 पेक्षा जास्त पोषक तत्त्वं, खाल तर निरोगी राहाल...

Amazing benifits of Spiny gourd : सध्याच्या फास्ट जगात आपली  जीवनशैली तर बदलली आहेच (Fast lifestyle) . सोबत आपला आहार देखील बदलला आहे. आपण अगदी काहीही खातो. आपण मुख्यत्वे चवीसाठी (tasty food ) खायला लागलो आहोत. मात्र आपण  खात असलेल्या अन्नातून शरीराराला किती पोषक तत्त्व (useful for health)  मिळतायत हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ताटात सर्व चवींचं अन्न असावं (Food we eat) . आपल्या जेवणात पालेभाज्या आवर्जून असाव्यात असं डॉक्टर देखील सांगतात. मात्र आपण त्याचं कितपत पालन करतो हे ज्याचं त्याचं त्यालाच माहित. या बातमीतून आम्ही तुम्हाला एका अशा एका फळभाजीबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये अनेक शरीर उपयोगी तत्व आहेत. तुम्ही या भाजीचा आपल्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच होऊ शकेल. 

या भाजीचं नाव आहे कंटोळा. ही भाजी पोषक तत्त्वांनी खच्चून भारलीये असं म्हंटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. आपल्याला ही भाजी मुख्यत्वे पावसाळ्यातच पाहायला मिळते. या भाजीत प्रोटिन्स, कार्ब्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, फायबर आणि सोबत व्हिटॅमिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, B12,व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D 2 आणि 3, व्हिटॅमिन H, व्हिटॅमिन K होतो. आपल्या शरीराला यापासून प्रचंड फायदा होतो. खास पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी एक अशी ही भाजी आहे.

कोणत्या रोगांवर आहे फायदेशीर?

या भाजीमध्ये नेमकी कोणती पोषक तत्त्वे आहेत हे आपल्याला समजलं. आता जाणून घेऊयात या भाजीचा आहारात समावेश केल्यास कोणत्या आजारांवर ही भाजी गुणकारी राहू शकते याबाबत. तुम्हाला पोटदुखी, डोकेदुखी, हाय ब्लड प्रेशर, मूळव्याध, डायबिटीस असेल तर अशांनी ही भाजी खाणं फायद्याचं राहू शकतं. सोबतच सर्पदंश किंवा लकवा मारला असेल तरीही या भाजीच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या झाडाची मुळे, पानं आणि फुलांचा आयुर्वेदात (Use in Ayurveda )  वापर केला जातो. 

health benifits of Spiny gourd also called as kantola in india