मुंबई : केसांचे आणि टाळूचे आरोग्य जपण्यासाठी पोषक आहार, शॅम्पू, तेल याप्रमाणेच तुम्ही कोणती फणी वापरत आहात यावरही अवलंबून असते.
तुमच्या केसांच्या पोतानुसार फणीची निवड केल्यास त्यांना जपणे अधिक सुकर होते. प्लॅस्टिकपेक्षा लाकडापासून बनवलेल्या फण्या अधिक फायदेशीर असतात. मग किमान हे ५ फायदे जाणून घ्या आणि लाकडाच्या फणीची निवड करण्याबाबतचा विचार करा.
केसांमधील गुंता मोकळा होतो - लाकडाच्या फणीची दातं ही इतरांच्या तुलनेत सौम्य आणि जाड असतात. केसांमध्ये लाकडाची फणी ही अगदी सहज फिरते.
केस तुटण्याची शक्यता कमी होते - केसांमध्ये शुष्कपणा अधिक असल्यास त्यांना मोकळं करणं कठीण होऊन बसतं.परिणामी अनेकदा केस विंचरताना ते तुटतात. या उलट लाकडी फणीचा वापर केल्यास केस तुटण्याची शक्यता कमी होते.
केसांमधील लवचिकता सुधारते - अनेकदा प्लॅस्टिकच्या फणीने केस विंचरून देखील ते विस्कटलेलेच वाटतात. यामागील एक कारण म्हणजे केसांमधील स्टॅटिक इलॅस्टिसिटी.. केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी लाकडी फणी फायदेशीर ठरते.
केसांमधील चिकटपणा कमी होतो - टाळूमधून स्रावणार्या सेबममुळे केस चिकट, तेलकट दिसतात. प्लॅस्टिकऐवजी तुम्ही लाकडी फणीचा वापर केल्यास टाळूवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत होते. परिणामी केस सतत चिकट, तेलकट दिसणार नाहीत.
टाळूचे आरोग्य सुधारते - लाकडाची फणी वापरल्याने टाळूला मसाज होतो. यामुळे टाळूजवळील भागाचे रक्ताभिसरण सुधारते.