मुंबई : हल्ली प्रत्येकजण थोडं डाएटकडे लक्ष द्यायला लागलं आहे. सर्रास काहीही खाण्यापेक्षा थोडं हलकं फुलकं खाण्याकडे लक्ष केंद्रीत केलं जाऊ लागलं आहे. यामध्ये भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना खाल्यामुळे आरोग्य चांगल राहतच पण त्याचबरोबर हे 6 फायदे होतात.
मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.
उच्च रक्तदाबावर देखील नियंत्रण येते मानसिक ताण, राग येणे यावर अंकूश येतो याच्या सेवनाने कारण हे कमळापासून तयार झालेले थंड प्रक्रुतीचे बीज आहे. चेहरा तजेलदार होतो याच्या सेवनाने, कारण यात व्हिटॅमीन 3 मुबलक असते. सुरकूत्या गायब होतात.
दैनिक आहारांत किमान २५ ग्रँम मखाना रोज खायला हवे. बाळंतिणीला पौष्टिक आहार म्हणून खिर, लाडु, वैगेरे स्वरूपात खायला देतात.
थोड्या तूपावर भाजून मग त्यावर सैंधव मीठ व लिंबू पिळून खावे एक चांगले ब्रेकफास्ट तयार होतो.
वजन कमी करण्यासाठी आहे, त्यांच्याकरता मखाने खूपच फायदेशीर आहे. कारण याने पोट लवकर भरते. मखान्याच्या सेवनाने अनिद्रा, अस्वस्थ वाटणे, दूर होते. मखान्यात पोटँशिअम भरपूर मात्रेत असल्याने रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबावर अंकुश राहतो. यात सोडिअम अत्यल्प प्रमाणांत असते. मखाना ग्लूटेन, मुक्त आहे, व प्रोटिन युक्त आहे. ग्लायसेनिल इंडेक्स अतिशय कमी असल्याने याचे सेवन मधुमेह रुग्णांनी नियमित करावे.
याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, याची निर्मिती करण्यासाठी कोणतेही रासायनिक खतं किंवा किटकनाशके वापरली जात नाही, त्यामूळे हे 'आँर्गेनिक फूड' आहे.