नेहमीच ऐकून असाल की Whiskey पिऊ नका, मात्र तुम्हाला माहितीयेत का त्याचे फायदे?

Whiskey पितात तर जाणून घ्या त्याचे फायदे...

Updated: Feb 18, 2023, 07:44 PM IST
नेहमीच ऐकून असाल की Whiskey पिऊ नका, मात्र तुम्हाला माहितीयेत का त्याचे फायदे?  title=

Health Benefits Of Drinking Whiskey : आपली सगळ्यात महत्त्वाची बिझनेस मीटिंग असो किंवा मित्रांसोबत बर्थडे. इतकंच काय तर सेलिब्रेशनची खास पार्टी ज्या लोकांना मद्यपान करायचे असते त्यांना या कधीच कारणाची गरज नसते. व्हिस्की जर एका विशिष्ठ प्रमाणात घेतली तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही त्याचे अनेक फायदे आहेत. चला तर आज आपण जाणून घेऊया विशिष्ठ प्रमाणात व्हिस्की घेण्याचे फायदे, आणि व्हिस्की संबंधीत असलेले काही मिथ्स...

सर्दी आणि खोकला (Cold And Cough) 

व्हिस्कीचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकला ऍलर्जीसारख्या आजारामध्ये आराम मिळू शकतो. याशिवाय व्हिस्कीच्या सेवनाने शरीराला ऊब मिळते आणि घसा खवखवणे कमी होते. सर्दीमध्ये कोमट पाणी आणि लिंबाच्या रसात व्हिस्कीचे सेवन केल्यास ते औषधासारखे काम करते.

स्मरणशक्ती सुधारते (memory)
व्हिस्कीमध्ये  इथेनॉलचे प्रमाण जास्त असते जे मेंदूतील न्यूरॉन्स सक्रिय ठेवण्यास मदत करते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमरचा धोका कमी होतो.

हेही वाचा : जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट 'इसबगोल' खाल्लं आणि मग...

पौष्टिक मूल्य (nutritional value) 
व्हिस्की कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे. व्हिस्कीच्या एका कपमध्ये फक्त 65 कॅलरीज असतात आणि त्यात फॅट नसते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यासाठी व्हिस्की हा बिअर पेक्षा एक चांगला पर्याय आहे. 

वजन नियंत्रण (Weight Control) 
व्हिस्कीमध्ये कॅलरी, फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल कमी असते, ज्यामुळे शरीरातील ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सचा धोका कमी होतो. याशिवाय, हे पचनक्रिया  योग्य ठेवते, ज्यामुळे शरीरातील चयापचय सुधारते आणि वजन कमी करणे सोपे होते.

कर्करोग प्रतिबंध (Prevents Cancer) 
व्हिस्कीचे सेवन कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते जे कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतात. 

हृदयाचे आरोग्य (Hearts Health)
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी स्नायूंसाठी व्हिस्की फायदेशीर ठरू शकते. हे रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.

आता आपण व्हिस्कीचे फायदे जाणून घेतले... मात्र, लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीच्या अती सेवनानं शरीराला हानी पोहोचू शकते त्यामुळे सगळ्या गोष्टी या प्रमाणातच असायला हव्या. व्हिसकी नक्कीच तुमच्या आरोग्यावर आणि शरीरावर चांगले फायदे देऊ शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)