Water after Tea: चहानंतर लगेचच पाणी पिताय? थांबा, ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते

Side Effects of Drinking Water After Tea: चहा हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो परंतु तुम्ही जर का चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच पाणी पित असाल (Water after tea and health) तर तुम्हाला ही सवय तातडीनं सोडणं आवश्यक आहे. कारण असं केल्यानं तुमच्या आरोग्यावर त्याचा घात परिणाम होऊ शकतो. 

गायत्री हसबनीस | Updated: May 13, 2023, 09:07 PM IST
Water after Tea: चहानंतर लगेचच पाणी पिताय? थांबा, ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते title=

Drinking Water After Tea: गरमागरम चहा प्यायल्याशिवाय आपल्यापैंकी कुणाचीच सकाळ पुर्ण होत नाही तेव्हा आपल्याला उठल्या उठल्या बेड टी तरी लागतोच लागतो. दिवसातून सारखा सारखा चहा पिण्याचीही पुष्कळ जणांना सवय असते. परंतु सारखा चहा पिणं हे आपल्या आरोग्यासाठीही चांगलं नसते. त्यानं पोटात एसिडिटी वाढू शकते. त्यातूनही जर का तुम्ही गरमागरम (Water after tea) चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पितं असाल तर असं करणंही तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. अनेकांना चहा प्यायल्यानंतर तहान लागते परंतु तहान लागणं यात काही चुकीचे नाही. परंतु चहा पिऊन झाल्यानंतर त्यावर ताबडतोब ग्लासभर पाणी पिणं हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. 

चहा हा मुळात आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही त्यातून त्यावर (Drinking water immediately after tea) पाणी पिणं हे तुम्हाला नुकसानीचे ठरू शकते. चहाचे अतिसेवन करणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे चहा प्यायल्यावर पाणी पिण्याचेही लोकांना भान उरले नाही तर त्यानं अजूनच धोका वाढू शकतो. त्यावेळी तुम्ही चहावर पाणी पिणं टाळालं पाहिजे. चहावर पाणी प्यायलानं अल्सरचा त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे तुमचे दातही खराब होऊ शकतात. मुळात तुमच्या तोंडावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो अशावेळी तुम्ही ही सवय सोडून देणं गरजेचे आहे. 

दातांवर परिणाम 

आपले दात हे अत्यंत अमुल्य असे असतात. आपल्याला आपल्या दातांची निगा राखणं अत्यंत महत्त्वाचे असते. दात निरोगी ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी पर्यंत केले पाहिजेत. परंतु जर का तुम्ही चहा पिऊन झाल्यावर पाणी पितं असाल तर तुमचे दात खराब होऊ शकतात. तेव्हा याकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. दात पिवळे पडू शकतात अथवा दातदुखी वाढू शकते. 

अल्सरचा त्रास 

तुम्ही चहाचे अतिसेवन केलेत तर तुम्हाला त्याच्या विचित्र परिणाम भोगावा लागू शकतो. तुम्ही जास्त प्रमाणात चहा प्यायलात तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात एसिडिटी होऊ शकते आणि जर तुम्ही चहावर पाणी प्यायलेत तर ही समस्या वाढूही शकते. तेव्हा याकडे दुर्लक्ष करू नका. एसिडिटी वाढलं तर तुम्हाला अल्सरचा त्रास होऊ शकतो. 

हेही वाचा - ''कॉलर वर करायची इच्छा...'' Sonakshi Sinha चं फोटोशूट ठरतेय चर्चेचा विषय

नाकातून रक्त येऊ शकते. 

उन्हाळ्यात हा त्रास होऊ शकतो तेव्हा शरीराचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. तेव्हा अशावेळी चहाचे सेवन जास्त प्रमाणात करू नका आणि त्यावर पाणीही पिऊ नका कारण त्यानं हा त्रासही उद्भवू शकतो. 

तुम्हाला खोकलाही होऊ शकतो. 

चहासोबतच जर का पाण्याचे सेवन केलेत तर तुम्हाला खोकल्याचा अतित्रासही होऊ शकतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)