How to Beat The Heat : घामोळ्यांनी आहात त्रस्त? उन्हाळ्यात 'या' सोप्या टिप्सचा होईल नक्की फायदा

How to Beat The Heat : उन्हाळ्यात होते घामोळींची समस्या... घरच्या घरी कोणती काळजी घेऊ शकतो आणि कोणत्या टीप्स वापरू शकतो ते जाणून घेऊया. उन्हाळ्या कोणते स्किन केअर टिप्स पाहिजे जेणे करून आपली त्वचा रुखी होणार नाही आणि हायड्रेटेड राहिले हे जाणून घेऊया.

दिक्षा पाटील | Updated: May 13, 2023, 06:47 PM IST
How to Beat The Heat : घामोळ्यांनी आहात त्रस्त? उन्हाळ्यात 'या' सोप्या टिप्सचा होईल नक्की फायदा  title=
(Photo Credit : File Photo)

How to Beat The Heat : यंदाच्या उन्हाळा हा आपल्यासाठी खूप गंभीर आहे. यंदा उष्णता ही दरवर्षीपेक्षा जास्त जाणवते. आपल्याला सतत येणार घाम आपल्या शरीरातील पाणी कमी होतं. हा घाम एका ठिकाणी येऊन थांबून राहतो. त्यामुळे पुरळ होते आणि खाज सुटते, तर काही लोकांना फोडही येतात. पण जेव्हा ते पुरळ किंवा फोड फुटतात आणि त्यातलं पाणी बाहेर येत त्यानं जास्त त्रास होतो. या सगळ्या गोष्टींपासून सुटका हवी असेल तर खूप पाणी प्या. कडक सुर्यप्रकाशापासून सावध रहा. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनने घाम येणे थांबवण्यासाठी आणि कडक उन्हाळ्यापासून वाचून राहण्यासाठी त्यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. या आज आपण जाणून घेणार आहोत.

कॉटनचे कपडे वापरा 
कॉटनचे कपडे परिधान करत फिटींगचे कपडे परिधान करू नका. फिटींग कपडे परिधान केल्यास घाम हा तुमच्या त्वचेवर राहतो. 

हायड्रेटेड रहा
उन्हाळ्यात आपलं शरीर हायड्रेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे उन्हाळ्यात खूप पाणी प्या जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेटेड राहिल. पाण्या व्यतिरिक्त तुम्ही फ्रुट ज्युस आणि नारळ पाणी देखील पिऊ शकता. त्यानं तुमच्या शरीराचं टेम्परेचर कमी होऊन ते थंड राहिल.

उन्हात जाणे टाळा 
गरज नसेल तर दुपारच्या वेळी बाहेर पडू नका. खूप महत्तावचं काम असेल तरच बाहेर पडा पण जातांना तुमच्यासोबत पाणी घ्या. मध्येच फ्रुट ज्युस प्या. 

हेही वाचा : Beer सोबत चकणा म्हणून चुकूनही करू नका 'या' गोष्टींचे सेवन; होऊ शकतात गंभीर आजार

केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरणं टाळा
उन्हाळ्यात घाम येऊन तुमची त्वचा खूप ड्राय होऊ लागते. त्यामुळे अनेक लोक वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतात. त्यात किती केमिकल आहे हे पाहतच नाही. अशात आता तुम्ही हर्बल प्रोडक्ट्स वापरण्या सुरुवात करा. यावेळी तुम्ही ऑइल फ्री मॉइश्चरायझर आणि स्किन केअर प्रोडक्ट्स वापरू शकतात. 

टॅल्कम पावडर 
उन्हाळ्यात गर्मी किंवा घामोळ्यांसाठी वेगवेगळ्या टॅल्कम पावडर मार्केटमध्ये मिळतात. जर तुम्हाला घामोळ्या असतील तरच वापर करा. कारण या पावडरचा वापर केल्यास तुमच्या शरीर थंड राहण्यास मदत होईल आणि त्वचा ड्राय करेल. 

घरच्या घरी वर्कआऊट करा

वर्कआऊट करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी जर तुम्हाला बाहेर वर्कआऊट करायची सवय असेल तर सकाळी लवकर उठून वर्कआऊट करून या. पण जर तुमची वेळ फिक्स नसेल तर घरच्या घरी वर्कआऊट करण्यास प्राधान्य द्या. 

त्वचेच्या घ्या अशी काळजी

उन्हाळ्यात त्वचेवर खास लक्ष द्या. तुमच्या शरीराला बॅक्टेरिया आणि घामापासून वाचून ठेवण्यासाठी रोज अंघोळ करा. हर्बल साबन वापरा ज्यात कडुलिंब आणि काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत. तुमच्या आजुबाजूला साफसफाई ठेवा इतकंच काय तर शरीर स्वच्छ राहिल याची काळजी घ्या. केमिकल असलेले साबन आणि शॅम्पु वापरू नका. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)