Health Tips :चुकूनही 'ही' फळं फ्रिजमध्ये ठेऊ नका.

काही भाज्या तसंच फळं फ्रीजमध्ये ठेवणं हानिकारक आहे.

Updated: Jun 17, 2021, 02:43 PM IST
Health Tips :चुकूनही 'ही' फळं फ्रिजमध्ये ठेऊ नका. title=

मुंबई : अनेकदा फळं खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवली जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे की काही भाज्या तसंच फळं फ्रीजमध्ये ठेवणं हानिकारक आहे. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, आंबा, टरबूज, लीची आणि इतर हंगामी फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत. तुमच्यापैकी बहुतेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया यामागील कारण 

आंबा आणि टरबूज यांचं उन्हाळ्यात अधिक सेवन केलं जातं. तज्ञांच्या मते, ही दोन फळं कमी तापमानात ठेवल्यास खराब होण्याचा धोका वाढतो. ही फळं कापूनही ठेवू नये. यामुळे या फळांचा रंग फिका होऊ लागतो आणि कापण्यामुळे बॅक्टेरिया त्याच्या पृष्ठभागावर वाढू लागतात.

केळं

केळ हे सुपरफूड मानलं जातं आणि कोणत्याही हंगामात उपलब्ध असतं. केळ्याला कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये. यामधून ईथाइलीन नावाचा गॅस बाहेर जातो जो इतर फळांनाही खराब करतो.

लिची

उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांच्या फ्रिजमध्ये लिची हे फळं दिसून येतं. लिचीला फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर आतील फळं खराब होऊ लागतं. 

लिंबू आणि संत्र

आंबट फळांना जास्त दिवस फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेऊ नये. या फळांना जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्या सालावर काळे डाग येतात.

तज्ज्ञांच्या मते, खोलीचं तापमान टरबूज, खरबूज आणि आंबा या सर्व फळांसाठी योग्य असतं. ही फळं ताजी ठेवण्यासाठी काही काळ थंड पाण्यात ठेवा. आवश्यकता असल्यास खाण्यापूर्वी फळाला कापून फ्रिजमध्ये 10 ते 15 मिनिटे ठेवू शकता.