लवकर येणारा मेनोपॉज रोखण्यासाठी या '५' चूका टाळा!

जीवनशैलीतील बदलांमुळे आजकाल मेनोपॉज लवकर येण्याचा धोका वाढला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 28, 2017, 11:05 AM IST
लवकर येणारा मेनोपॉज रोखण्यासाठी या '५' चूका टाळा! title=

मुंबई : जीवनशैलीतील बदलांमुळे आजकाल मेनोपॉज लवकर येण्याचा धोका वाढला आहे. ३० शी च्या शेवटच्या टप्प्यात किंवा ४० शी च्या सुरवातीच्या टप्प्यात मेनोपॉज येतो. परंतु, जीवनशैलीतील काही चुका टाळल्यास लवकर येणारा मोनोपॉज आपण रोखू शकतो. 

व्यायामाचा अतिरेक टाळा:

नियमित व्यायाम केल्याने आपण लवकर येणाऱ्या मोनोपॉजला आळा घालू शकतो. व्यायामामुळे हॉर्मोन्सला चालना मिळते आणि शरीरातील फॅट नियंत्रित राहते. परंतु, अतिरिक्त व्यायामामुळे ओव्यूलेशन अनियमित होते. परिणामी हार्मोनल इम्बॅलन्स होतो, असे the Journal of Mid-Life Health च्या अभ्यासातून दिसून आले आहे. महिना-दोन महिने मासिक पाळी न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

स्मोकींग करणे टाळा:

the Annals of Medical and Health Sciences Research Journal च्या अभ्यासानुसार मोनोपॉज लवकर येण्यास स्मोकींग करणे कारणीभूत ठरते. सिगरेटमध्ये निकोटीन, कार्बन मोनोऑक्साइड आणि cyanide असते. त्यामुळे स्त्री शरीरातील अंडी कमी होण्याची गती वाढते. अंडी एकदा नष्ट झाल्यावर परत त्याची उत्पत्ती होत नाही. परिणामी मोनोपॉज लवकर येतो. 

प्लॉस्टिक प्रॉडक्स वापरणे बंद करा:

तुम्हाला माहित आहे का? मेकअप, बॉडीवॉश आणि प्लॉस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या यामुळे हार्मोन असंतुलित होतात. the Journal British Menopause Society च्या अहवालानुसार प्लॉस्टिकमध्ये पर्यावरणाला हानिकारक असलेले endocrine disrupters असतात. घरगुती सामानात आणि कॉस्मेटिक्स मध्ये वापरलेले जाणारे phthalates हे मोनोपॉज लवकर येण्यास कारणीभूत ठरतात. 

BMI नुसार वजन नियंत्रित राखा:

स्त्रियांमध्ये एस्ट्रोजनची अतिरिक्त प्रमाण असण्यास अति वाढलेले वजन कारणीभूत ठरते आणि ओव्हरीयन फेल्युअर होण्याचे हे सामान्य कारण आहे, असे the journal Maturitas च्या अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे. म्हणून हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी वजन नियंत्रित ठेवा. 

अल्कोहोलचे सेवन करू नका:

the journal Maturitas च्या अहवालानुसार अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन आणि लवकर येणार मेनोपॉज व फर्टिलिटी कमी होणे याचा थेट संबंध आहे. म्हणून अल्कोहोलचे सेवन करण्यापूर्वी नक्कीच विचार करा.