Hair Care Tips: 'अशा' वेळी केसांना लावू नका तेल, नाहीतर...

 आज-काल केस गळती आणि केस पांढरे होणे या  समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अनेक वेळा केस वाढण्यावसाठी आपण अनेक प्रयोग करत असतो. मात्र याचा फायदा न होता मोठ्या प्रमाणात तोटाच असतो.  त्यामुळे...

Updated: Aug 22, 2022, 11:36 AM IST
Hair Care Tips: 'अशा' वेळी केसांना लावू नका तेल, नाहीतर...  title=

Do Not Apply Hair Oil In These Situations:  सुंदर लांबसडक आणि दाट काळसर केस हा प्रत्येक स्त्रीचा एक दागिना असतो. पण आज-काल केस गळती आणि केस पांढरे होणे या  समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अनेक वेळा केस वाढण्यावसाठी आपण अनेक प्रयोग करत असतो. मात्र याचा फायदा न होता मोठ्या प्रमाणात तोटाच असतो.  त्यामुळे लांबसडक केस असण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी डायट बरोबर त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. दरम्यान तेल लावल्याने रक्ताभिसरण वाढते, केस जाड आणि मजबूत होतात. पण काही विशिष्ट परिस्थितीत तेल लावणे टाळावे  जाणून घ्या 

कपाळवर पुरळ - जर तुमच्या कपाळावर पुरळ दिसत असेल तर अशा वेळी डोक्याला तेल लावण्याची चूक करू नका. तेल लावल्याने मुरुमांची संख्या वाढू शकते. जर तुमची स्कॅल्प तेलकट असेल तर चेहऱ्यावर तेल येऊ शकते आणि मुरुमांसोबत त्वचेशी संबंधित इतर समस्याही असू शकतात. त्याचबरोबर ही समस्या टाळण्यासाठी केसांना वेळोवेळी शॅम्पू आणि पाण्याने स्वच्छ करा, असे केल्याने कपाळावर आणि चेहऱ्यावर जास्तीचे तेल येणार नाही. 

तेलकट टाळू-  जर तुमची टाळू आधीच तेलकट असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तेल लावणे टाळावे. टाळूवर जास्त तेल लावणे चांगले नाही. यामुळे टाळूला खाज येण्याची समस्या होऊ शकते. कारण तेलकट टाळू असल्यास केस गळण्याचा धोका वाढतो. दुसरीकडे, जर तुमच्या टाळूवर तेल असेल तर दररोज तेल लावण्यापेक्षा आठवड्यातून दोनदा तेल लावणे चांगले.

कोंडा- जर तुमच्या टाळूवर कोंडा झाला असेल तर तेल लावण्याची चूक करू नका. कोंडा असलेल्या केसांना तेल लावल्याने कोंडा वाढू शकतो. बुरशीजन्य संसर्गामुळे कोंडा होतो. दुसरीकडे तेल लावल्यास बॅक्टेरियाचे प्रमाण वाढेल. याशिवाय, टाळूमध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग असला तरीही तेल लावणे टाळावे.

फंगल इंफेक्शन - टाळूवर  कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग असल्यास तेल लावू नका. 

केस गळणे - केस गळतीमुळे त्रास होत असेल तर केसांच्या तेलाऐवजी हेअर मास्क लावणे चांगले

टाळूला घाम येणे - टाळूवर जास्त घाम येत असेल तर कमीत कमी तेल लावावे. तेल फक्त कोरड्या टाळूला लावा

टाळूवर  मुरूम - तेल लावल्याने घाण टाळूला सहज चिकटते आणि मुरूमही बरे होत नाही

या गोष्टी लक्षात ठेवा - रात्रभर  डोक्यावर तेल सोडू नका. यामुळे स्कॅल्पमध्ये पिंपल्सची समस्या उभ्दवू शकते. 

 

( वरील बातमी माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)