Belly Fat loss : सध्याच्या काळात भविष्य घडवण्यासाठी म्हणून सातत्यानं धावपळीत असणाऱ्या पिढीकडे स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देण्याचाही वेळ नसतो. अवेळी खाणं, घरातल्या आहाराअभावी अनेकदा बाहेरच्या खाद्यपदार्थांना पसंती देणं या साऱ्याचे परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतात. हे तेव्हा लक्षात येतं जेव्हा वजनकाट्यावर आपल्या वजनाचा आकडा अनपेक्षितपणे वाढलेला दिसतो.
पोट आणि कमरेचा घेर वाढू लागला, की अनेकांच्याच चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्टपणे दिसू लागते. पण, ही चिंता करत बसण्यापेक्षा योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि महागड्या वस्तूंना पसंती देण्यापेक्षा तुमच्या घरातच असणाऱ्या पदार्थांचा योग्य वापर कसा करता येईल यावर जोर द्या. (Belly Fat loss Tips and tricks obesity weight loss )
रात्री उपाशी पोटी झोपणं म्हणजे या आजारांना देताय आमंत्रण
तुम्हाला माहितीये का घरातील मसाल्याचा डब्यात असणारे काही घटकही तुमच्या पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी मदत करतील. कसे? एकदा पाहा...
हळद (Turmaric) - हळदीमुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेटाबॉलिझम वाढतं, ज्यामुळं वजन कमी करण्यात मदत होते. दुधात हळद मिसळून प्यायल्यास त्याचे शरीराला कैक फायदे होतात.
जीरं (Cumin)- अन्नपदार्थांची चव वाढवण्यासोबतच जीऱ्याचा वापर पचनक्रियेतही होतो. सूज आणि शरीरातील गॅसेस नियंत्रणात ठेवण्यातं काम जीरं करतं. जीरं भाण्याच भिजवून सकाळल्या वेळेत खाल्ल्यास त्यामुळं वजन नियंत्रणात राहतं.
काळीमिरी (Black Paper)- शरीरातील वाढीव चरबी कमी करण्यासाठी काळीमिरी मदत कते. पोटाच्या चरबीनं तुम्ही त्रस्त असल्यास जेवणात काळीमिरी जरुर समाविष्ट करा.
आलं (Ginger)- अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात आल्याच्या चहानं करतात. आलं पचनसंस्थेला योग्य पद्धतीनं चालू ठेवण्यास मदत करतो. शिवाय त्यामुळं भूकही कमी लागते. परिणामी अप्रत्यक्षरित्या त्यामुळं वजन कमी होण्यात मदत होते.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांतून घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)