केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी 'असा' आहार घ्या

केसांचं आरोग्य जपण्यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे.

Updated: Jun 20, 2021, 02:55 PM IST
केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी 'असा' आहार घ्या title=

प्रत्येकाच्या सौंदर्यातील एक भाग म्हणजे केस. यासाठी आपण अनेक पद्धतींना केसांची काळजी घेतो. केसांचं आरोग्य जपण्यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे. पोषक आहार घेतल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.  

प्रोटीन

केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जर तुमच्या आहारात प्रोटीन्सचं प्रमाण कमी असेल तर, केस कोरडे, पातळ आणि कमजोर पडण्याती भीती असते. प्रोटन्समुळे केसांना मजबूता मिळून केस लांब होण्यास मदत होते. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळण्याची शक्यता असते.  

लोह

दररोजच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे केसांचं आरोग्य जपासण्यास मदत होईल. शरीरात जर लोहाची कमतरता निर्माण झाली तर केस गळण्याची शक्यता असते.  

बायोटीन

जर तुमच्या आहारच बायोटीनची कमतरता असेल तर केस गळण्याचा धोका असतो. यासाठी अंड, शेंगदाणा, बदाम, लो फॅट चीज यांचा समावेश करावा.

झिंक

आहारात झिंकचं प्रमाण कमी असेल तर केस हळू वाढतात तसंच डँड्रफची समस्या देखील होऊ शकते. यासाठी आहारात पीनट बटर, योगर्ट, सुकामेवा, अंड यांचा समावेश करा.

जर या सर्व गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश असेल तर तुमच्या केसांचं आरग्य सुधारण्यास मदत होईल.