Diabetes Tips : डायबिटीजचं नाव घेतलं तरी अनेकांना आजही भीती वाटते. जर घरात आई वडील, या कुठल्याही सदस्यांना मधुमेह (Diabetes Health Tips) हा आजार असेल तर काय इतरांच्या मनात भीती असते हा आजार आपल्याला तर होणार नाही. मधुमेह म्हणजे गोड पदार्थांवर कायमची बंद. त्याशिवाय अनेक पदार्थांवर नियंत्रण (blood sugar control) येतं. त्यामुळे हा आजार कोणालाही नको असतो. पण आज दहा माणसांमागे 4 लोकांना तरी ही समस्या असते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मधुमेह (Diabetes) रुग्णांची संख्या वाढली आहे. (Diabetes Doctor Tips)
आज आपण मधुमेहसंदर्भातील तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर खास तज्ज्ञांकडूनच (Doctor Tips) समजून घेणार आहोत. मधुमेह म्हणजे काय, कोणाला होतो, त्याची लक्षणं काय या सगळ्याबदल आज आपल्याला सांगणार आहेत फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. उमेश आलेगावकर. यूट्यूबर Talk with DOC या कार्यक्रमात त्यांनी मधुमेहावर मार्गदर्शन केलं आहे. (Doctor Tips Video)
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे हे प्रामुख्याने लक्षण दिसून येतं. दुसरं म्हणजे भूक न लागणे. शरीराची हालचाल मंदावते. तोंडला घाण वास येणे. याशिवाय युरिनला (लघुशंका) घाणेरडा वास येतो.
त्याशिवाय बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळेही अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. मधुमेह हा आजार अनुवंशिक आहे. जर तुमच्या आई वडील, काका काकू यांना जर मधुमेह असेल तर तो तुम्हाला होऊ शकतो. (diabetes symptoms causes precausions and How to Control Diabetes blood sugar control expert advice health tips in Marathi Doctor video)
गेल्या कित्येक वर्षांपासून मधुमेहाचे प्रकार टाइप 1 आणि टाइप 2 हेच सर्वश्रुत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल पण जगभरात मधुमेहाचे पाच प्रकार आहेत. (How to Control Diabetes in Marathi)
जर तुम्ही नियमितपणे दररोज तीन गोष्टींचं पालन केल्यास मधुमेहावर नियंत्रण (blood sugar test) मिळवू शकतो, असं डॉ. उमेश आलेगावकर यांनी सांगितलं आहे. ते म्हणतात की, या त्रिसूत्री नियमात आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यानंतर नियमित दररोज व्यायाम गरजेचा आहे. त्यासोबत औषधं उपचारची जोड असल्यास तुम्ही मधुमेहासोबत हेल्दी आयुष्य जगू शकता. (blood sugar control)
फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ, ओमेगा -3, फॅटी एसिड, जीवनसत्त्वे, खनिजे यांचा आहारात समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळं, कमी पॉलीश केलेला तांदळू, नाचणी, कडधान्ये याचं सेवन या रुग्णांनी कराला हवं.
सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत. अन्यथा शरीरातील साखरेची पातळी अचानक अधिक वाढते आणि समस्या निर्माण होते. सॅच्युरेटेड फॅट्स असणारे पदार्थ म्हणजे पामतेल, तूप, साय, लोणी, अंड्यातील पिवळा बलक इत्यादी पदार्थ या रुग्णांनी टाळले पाहिजे.