Diabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही

Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल. 

श्वेता चव्हाण | Updated: May 19, 2023, 11:51 AM IST
Diabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही  title=
Diabetes Control tips

Diabetes Control tips for Summer : भारतात मधुमेहींची (Diabetic patients) संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. याला अनेक घटक कारणीभूत असले तरी मधुमेह झाल्यानंतही रुग्णांकडून या आजाराला अगदी सामान्य असल्यातची वागणूक दिली जाते. जे भविष्यात मधुमेह रुग्णांच्या आरोग्यासाठी सर्वात धोकादायक ठरु शकते. मधुमेहाच्या बाबतीत शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood sugar levels ) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

अशा परिस्थितीत रुग्ण संतुलित आहार घेऊन रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) नियंत्रित करू शकतो. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत एकतर टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह टाइप 1 मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणात (diabetes control) ठेवायचा असेल तर खाण्याच्या सवयींवर लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेहावर कोणताही निश्चित इलाज नसला तरी आणि खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही तर तुमची प्रकृती गंभीर होण्यापासून वाचवू शकत नाही. 

रिफाइंड पीठ (Refined flour)

रिफाइंड केलेली पीठ, जसे की मैदा, गव्हाचे पॅक पीठ यामुळे मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते. व्हाईट ब्रेड, पास्ता, तांदूळ इत्यादींमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते आणि फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. मधुमेहाच्या रुग्णांनी अशा पदार्थांचे सेवन टाळावे. पांढऱ्या रंगाचे पदार्थ जास्त स्टार्चयुक्त असतात त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते.

बटाटे (Potatoes)

बटाट्यात सर्वात जास्त स्टार्चचा साठा आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 111 आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढू शकते. आपल्यापैकी अनेकांना बटाटे खायला आवडतात, पण अशा परिस्थितीत एक सोपा उपाय म्हणजे फक्त बटाटे खाऊ नका. भाजीतल बटाटा खाऊ शकता, पण बटाट्याची भजी, फ्रेंच फ्राईज, चिप्स खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते.

मांसाहारी (non-vegetarian)

मधुमेही रुग्णांनी मांसाहार म्हणून लाल मांस, सॅलम टाळावे. हे पदार्थ मधुमेहींसाठी अक्षरशः विषासारखे काम करू शकतात. आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स हे रक्तातील साखर वाढवण्याचे कारण आहे. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर महिन्यातून एकदाच चिकन आणि मटण खाण्यास हरकत नाही.

सोडा पेय (Soda drink)

मधुमेहाच्या रुग्णांना गोडाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये कृत्रिम फळांचा ज्यूस, आइस टी, सोडा यांचा समावेश अधिक प्रमाणात असतो. या सोडायुक्त पेयांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ड्रिंक्समध्ये असलेल्या फ्रक्टोजमुळे शरीरात इन्सुलिनचा प्रभाव पडतो. तसेच वजन वाढते, फॅटी लिव्हरमुळे अपचनाचा त्रास होतो. 

मीठाचे कमी सेवन (salt)

मिठाच्या अतिसेवनामुळे केवळ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते असे नाही तर अनेक गंभीर समस्या, विशेषत: हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढू शकतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही दररोज 2,300 मिलीग्रामपेक्षा कमी मीठ खावे.  

 

 

 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)