Drinking Cold Water : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Tips) सुरू झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते. बाहेरुन आल्यानंतर पहिली धाव ही घरातील फ्रीजजवळ जाते. जो पर्यंत थंड पाण्याचा एक घोट घशामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला आराम मिळत नाही. जरी थंड पाणी पिल्याने तहान भागते. परंतु जास्त थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त थंड पाणी तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करु शकते. उन्हाळ्यात लोकांनी जास्त पाणी प्यावे. परंतु ते पाणी कसे आणि कोणते पित आहोत याची खबरदारी घ्यावी.
उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पियाल्यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. कारण अन्न खाताना अतिशय थंड पाणी प्यायल्याने अन्न पचण्याऐवजी शरीर त्या उर्जेचा वापर पाण्याचे तापमान सामान्य करण्यासाठी करते. त्यामुळे जेवतना जास्त थंड पाणी पिऊ नये असा तज्ञ्जांचा सल्ला आहे.
उन्हातून फिरुन आल्यानंतर पहिले थंड पाण्याची गरज भासते. पण तुम्हाला माहित आहे का? हेच थंड पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. आणि हायड्रेशनसाठी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र उन्हाळ्यात फ्रीजमधले थंड पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.
पाणी नेहमी सामान्य किंवा किंचित कोमट असावे. थंड पाणी प्यायालामुळे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच थंड पाणी प्यायल्यामुळे पोट आकुंचन पावते. त्यामुळे अन्न पचणे कठीण होते. लोक सहसा थंड पाणी पितात, त्यांना पचनाशी संबंधित समस्या जास्त प्रमाणात होते.
थंड पाण्यामुळे शरीराच्या इतर अवयवांचे नुकसान होते. थंड पाणी पिल्याने नाकातील श्लेष्मल त्वचा कडक होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. सर्दी किंवा फ्लूची समस्या असल्यास थंड पाणी पिणे टाळा. त्यामुळे थंडीशी संबंधित समस्या उद्भवू शकते.
अतिप्रमाणात थंड पाणी प्यायालामुळे डोकेदुखी होऊ शकते. तसेच मायग्रेनची समस्या वाढू शकते. जर तुम्ही आधीच मायग्रेनचे बळी असाल तर थंड पाण्यामुळे आणखी त्रास जाणवू शकतो.
संशोधकांचे म्हणणे आहे की, थंड पाणी पिणे केवळ हानिकारकच आहे तर काही परिस्थितींमध्ये ते फायदेशीर देखील आहे. एका अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, व्यायामादरम्यान थंड पाणी पिल्याने शरीराचे तापमान खूप वाढण्यापासून रोखता येते. थंड पाणी पिण्याचे फायदे जरी मर्यादित असले तरी याला अधिक चांगला पर्याय मानता येणार नाही.
उन्हाळा असला तरी नेहमी सामान्य पाणी पिण्याती सवय लावा. तसेच कोमट पाणी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. कोमट पाणी पिणे हा तुमच्यासाठी पचन, रक्ताभिसरण आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. कोमट पाणी प्यायल्याने तहान कमी लागते. म्हणूनच उन्हाळ्यात सामान्य पाणी पिण्याची सवय लावा.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)