मुंबई : कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत असताना दिवसाची सुरूवात सकारात्मक होणं अत्यंत गरजेची आहे. परिस्थिती कितीही कठीण आणि खडतर वाटत असली तरीही आपल्याला यावेळी मनस्थिती सांभाळणं अतिशय गरजेची आहे. कोरोनाच्या या काळात माणूस माणसापासून शरीराने लांब आहे पण आपण मनाने सगळे एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. या प्रंसगात खऱ्या माणुसकीची दर्शन घडत आहे. कुणी रक्ताचं नसतानाही रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक जीव लावत आहे.
कोरोनाच्या या काळात आपल्या शरीरासोबतच मनावरही परिणाम होत आहे. प्रत्येकजण चिंता, ताण आणि मानसी तणावातून जात आहे. कोरोनाच्या या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपले सकारात्मक विचारच महत्वाचं आहे. नकारात्मकतेमुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती दूर करून आपण चिंता, ताण आणि मानसी तणाव या गोष्टी जवळ करतो. अशावेळी स्वतःचं स्वतःवर संयम असणं अत्यंत गरजेचं आहे.
* तुम्ही ठरवून नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करायचे आहेत. मग सकारात्मक विचार कोणते करायचे? तर या ठिकाणी तुम्ही 'विश्वप्रार्थना' म्हणू शकता.
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवं,
सर्वांच भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात आनंदात ठेव.
या चारओळीच्या विश्वप्रार्थनेतून तुम्हाला सकारात्मक विचारांची साथ मिळेल आणि ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल.
*कोरोनाच्या काळात कळत नकळत अनेकांची मदत झाली. ओळख नसतानाही माणूस आपलंसं वाटलं यावेळी कृतज्ञता व्यक्त करा. लॉकडाऊनचा हा काळ आपल्यात सकारात्मक बदल करणार आहे. असा विचार करून काही गोष्टींना आजच सुरूवात करा.
* आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल. आपली ओळख नसतानाही काहींकडून आपल्याला सहज मदत उपलब्ध झाली असेल. अनेक तुमच्या गोष्टी सहज घडल्या असतील. त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करा. यामध्ये आपल्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले सगळे डॉक्टर, नर्सेस तसेच पोलिसांची कृतज्ञता व्यक्त करू शकता. तसेच या परिस्थितीत अनेक संस्था आणि काही माणसं निःस्वार्थी भावनेने सेवा करत आहेत.
*Gratitude Diary लिहून तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. त्या व्यक्ती बद्दल चार ओळी बोलून त्यांच्या कामाबद्दल धन्यवाद राहा. आणि त्यांच्याकडून असेच उत्तम काम व्हावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देवू शकता.
देवा यांचं भलं कर
देवा यांचं कल्याण कर
देवा यांचा संसार सुखाचा कर
* कोरोनाने आपल्याला या परिस्थितीत शरीर किती महत्वाचे आहे याची जाणीव करून दिली. 'शरीर साक्षात् परमेश्वर'. पण आपल्याला याचा विसर पडला होता. ऑक्सिजन सारखी अतिशय मोफत आणि मुबलक प्रमाणात असलेली गोष्ट किती महत्वाची आहे. याची जाणीव झाली. जे आहे त्याच्यासाठी कृतज्ञ राहणं किती गरजेचं आहे ते उमगलं
* शरीर महत्वाचं असताना त्याची निगा राखणं अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी योग्य व्यायाम, पुरेसं अन्न आणि सुंदर विचार याची शरीराला नितांत गरज आहे. अशावेळी आपल्या शरीराला सकारात्मक स्वयंमसूचना देणे गरजेचे आहे. तेव्हा या गोष्टीचा तुम्हाला सर्वाधिक फायदा होईल.
* कोरोनाच्या काळात आपल्याला कटाक्षाने जाणवलं शरीरासोबतच त्यातील प्रत्येक अवयवही तेवढाच महत्वाचा आहे. या सगळ्यांसाठी एक मनोभावे कृतज्ञता व्यक्त करावी.