मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. 

Updated: Aug 12, 2022, 06:17 AM IST
मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले title=

दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढलीये. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत 2,726 नवे संक्रमित आढळले आहेत. मुख्य म्हणजे या प्रकरणांमुळे गेल्या 6 महिन्यांतील बाधित रुग्णांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. त्याचबरोबर 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यादरम्यान संसर्ग दर 14.38 टक्क्यांवर आला आहे. 

ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांत दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाची 19,760 प्रकरणं समोर आली आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. 

1 ऑगस्टला दोन, 2 ऑगस्टला तीन, 3 ऑगस्टला पाच, 4 ऑगस्टला चार, 5 ऑगस्टला दोन, 6 ऑगस्टला एक, 7 ऑगस्टला दोन, आठ ऑगस्टला सहा, 9 ऑगस्टला सात आणि 10 ऑगस्टला दिल्लीत आठ लोक कोरोनाने मरण पावले. दिल्लीत आतापर्यंत 26,351 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. 

कोरोनाची लागण कोणाला?

दिल्लीतील वाढत्या मृत्यूंबाबत अधिकारी आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, इतर आजारांनी ग्रस्त लोकच कोरोनाला बळी पडत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, अचानक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येते. या रुग्णांवर आधीच इतर आजारांवर उपचार सुरू असतात.

मुंबईत एका दिवसात 79% रुग्ण वाढले

मुंबईतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतायत. बुधवारी 852 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 1 जुलैनंतर एका दिवसात आढळून आलेली ही सर्वाधिक प्रकरणं आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे 11,29,285 रुग्ण आढळले आहेत. तर 19,661 लोकांना साथीच्या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

1 जुलै रोजी मुंबईत 978 प्रकरणं आढळून आली होती. मुंबईत एका दिवसात 79% रुग्ण वाढले आहेत. यापूर्वी मंगळवारी 476 प्रकरणं नोंदवली गेली होती.